Drought Affected Farmers : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगीनला, लवकरच मदत जमा होणार

Kolhapur Drought : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिग्लज या दोन्ही तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला.
Drought Affected Farmers
Drought Affected Farmersagrowon

Kolhapur Drought Affected Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिग्लज या दोन्ही तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण झाल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला. यामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामे करून तहसील कार्यालयातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगीनला ऑनलाईन अपलोड करण्यात आली. यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बाधितांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.

शासनाने पहिल्या टप्प्यात ४ कोटी ९ लाख ९७ हजारांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीला अनुषंगून तहसील कार्यालयाने ११ हजार ११७ नुकसानग्रस्त शेतकरी खातेदारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगीनला अपलोड केली आहे, परंतु यातील ६५४ खातेदारांचे बँक खाते व आधार क्रमांक चुकीची असल्याने संबंधितांच्या नावासमोर 'फेल रेकॉर्ड'चा शेरा पडला आहे. यामुळे त्यांच्यासाठी मंजूर २४ लाख ३७ हजारांची मदत जमा होण्यास विलंब लागणार आहे.

दरम्यान, १० हजार ५२३ शेतकरी खातेदारांना ३ कोटी ८५ लाखांची मदत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. चुकीची माहिती असलेल्या संबंधित ६५४ खातेदारांकडून बँक खाते व आधार क्रमांक पुन्हा मागवले आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्याही खात्यावर मदत वर्ग होणार आहे.

अजून एक कोटी ८५ लाख हवेत दरम्यान, तालुक्याला दुष्काळी मदतीसाठी ५ कोटी ९५ लाखांची गरज आहे, मात्र शासनाकडून ४ कोटी ९ लाखांचा निधी मिळाला आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात हलकर्णी, नूल, कडगाव, महागावसह गडहिंग्लज मंडळमधील गडहिंग्लज शहर, वडरगे, बड्याचीवाडी अशा ५८ गावांतील ११ हजार ११७ खातेदारांना मदत मिळणार आहे. दरम्यान, उर्वरित दुंडगे, नेसरी व गडहिंग्लज मंडळमधील शिल्लक गावांतील खातेदारांसाठी आवश्यक १ कोटी ८५ लाख निधीची गरज आहे.

Drought Affected Farmers
Drought in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ भीषणता! ११७ गावे व १२८ वाड्यांना पाणीपुरवठ्याची व्यवस्था

ई-पीक पाहणीनुसार मदत

जुलै-सप्टेंबरदरम्यान पिकांची नोंदणी ई-पीक पाहणीद्वारे केलेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. त्यातही जिरायत नोंद आवश्यक मानली आहे. या पीक पाहणीवेळी सातबाऱ्यावर विहीर, कूपनलिकेची नोंद केलेल्यांना मदत मिळणार नाही. नुकसान होऊनही जलस्त्रोताची नोंद असेल तर तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे आणि पीक चांगले येऊनही पीक पाहणीत जिरायत नोंद असेल, तर त्याला मदत मिळणार आहे. हा विचित्र योग काहींच्या नशिबी आल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन अपलोड केली आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ५८ गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होईल. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, पुरवणी यादीही पाठवली आहे. मदत देण्यात आचारसंहितेची अडचण येणार नाही. - ऋषिकेत शेळके, तहसीलदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com