AI Technology Agrowon
ॲग्रो विशेष

AI Technology : 'एआय' तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय होऊ शकत नाही

Agriculture AI : वनराई संस्थेतर्फे आयोजित पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची एकदिवसीय पर्यावरण प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी (ता. २८) घेण्यात आली.

Team Agrowon

Pune News : ‘एआय’ हे तंत्रज्ञान जरी खूप मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध करून देत असले तरी ज्ञान, शहाणपण, चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित करणे, या भूमिका शिक्षकच चांगल्या पद्धतीने करू शकतात. शिक्षकांना ‘एआय’ तंत्रज्ञान कधीच पर्याय होऊ शकत नाही. मात्र शिक्षकांनी आपली ही भूमिका वेळीच ओळखली पाहिजे, असे मत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. जी. नागार्जुन यांनी व्यक्त केले.

वनराई संस्थेतर्फे आयोजित पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची एकदिवसीय पर्यावरण प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी (ता. २८) घेण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानी वनराईचे विश्‍वस्त रोहिदास मोरे, कारीगर संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण थेटे, वाहिनीचे समन्वयक बसवंत विठाबाई बाबाराव, अरुण गांधी आदी उपस्थित होते.

श्री. नागार्जुन म्हणाले, की आपल्याकडे नोंदी घेण्याची पद्धत रूढ नसल्यामुळे आपण विज्ञान विषयात मागे आहोत. नोंद रेकोर्ड करणे, नोंदी रिपोर्ट करणे आणि त्या नोंदीचा वापर करून रिसर्च करणे हे विज्ञान पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सर्वांमध्ये शिक्षक कळीची भूमिका बजावू शकतात. कार्यशाळेत सुजाता मुळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

शिक्षकांनी मातीत हात घातला

‘रोपवाटिकेसाठी माती कशी तयार करायची, सीडलिंग ट्रेच्या वापरातून कमी खर्चात रोपे कशी तयार करायची, बिया कशा रुजवायच्या, बियाणांची रुजवण करण्यापूर्वी बियाणे प्रक्रिया कशी करायची अशा विविध बाबींचे प्रात्यक्षिक करीत शिक्षकांनी रोपवाटिका तंत्राचे धडे गिरविले. मातीशी पुन्हा नाळ जोडत शिक्षकांनी प्रत्यक्ष मातीत हात घालत रोपवाटिका ट्रे आणि पिशवी भरून पाहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Exports: फिलीपिन्स, सेनेगलला तांदूळ निर्यातीचा मार्ग मोकळा, 'अपेडा'कडून नोंदणी सुरु

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिक

Local Body Elections: जिल्हा परिषदेचा बिगुल वाजला

Agriculture Exhibition: वेल्हाळेतील कृषी प्रदर्शन नागरिकांनी गजबजले

Sugarcane Crushing Season: नांदेड विभागात ऊस गाळपात खासगी कारखान्यांची आघाडी

SCROLL FOR NEXT