Agriculture AI
Agriculture AIAgrowon

Agriculture AI : शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर

Agriculture Technology : शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा, पाण्याची आणि खतांची बचत होईल तसेच मनुष्यबळ कमी लागेल.

Baramati News : शेती व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीसाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा, पाण्याची आणि खतांची बचत होईल तसेच मनुष्यबळ कमी लागेल. यासाठी आधुनिकता जाणून घ्या, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी शेतकऱ्यांना दिला.

‘ॲग्रोवन’ आणि ‘धानुका ॲग्रीटेक लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ॲग्रोवन’च्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे ‘दुष्काळी परिस्थितीत ऊस पिकाचे नियोजन व खोडवा व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये भोईटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Agriculture AI
Agriculture AI : एआय मुळे वाढणार जमीनीची सुपीकता ?

ऊस पीक घेताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. कमी पाण्यात चांगले उत्पादन घेता येते, यासाठी व्यवस्थापनाची पंचसूत्री जाणून घेतली पाहिजे. ऊस वाढीच्या पाच अवस्था आहेत. प्रत्येक अवस्थेची गरज शेतजमिनीनुसार वेगळी असू शकते यासाठी प्रत्यक्ष स्थळ पहाणी करून पाणी देण्याची योग्य पद्धत निवडावी लागते.

ठिबक सिंचनातून आठ दिवसाला कमी खर्चातील औषधांच्या मात्रा दिल्यास आपल्या अपेक्षेप्रमाणे एकरी ऐंशी ते शंभर टनांपर्यंत उत्पादन निघू शकेल, यासाठी फर्टिगेशन करणे पीक वाढीच्या अवस्थेनुसार गरज ओळखून खते द्या. हे समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञान समजून घ्यावे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाईल. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Agriculture AI
AI In Agriculture : ऊस उत्पादकता वाढीची साखर कारखान्यांना संधी

‘धानुका ॲग्रीटेक लिमिटेड’चे उपमहाव्यवस्थापक संजय पाटील यांनी ऊस उत्पादन घेण्यासाठी कंपनीमार्फत केलेल्या नवीन कीटकनाशकांची आणि खतांची माहिती ती वापरण्याची योग्य पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगितली.

उत्पादन वाढ तंत्रज्ञान या दृष्टिकोनातून विविध उपायांचे नियोजन याबाबत ‘धानुका ॲग्रीटेक’चे विषय वस्तूतज्ज्ञ घनश्याम इंगळे यांनी माहिती देऊन विविध उत्पादने व त्यांचे कार्य आणि कंपनीची वाटचाल त्याचबरोबर ‘इंडिया का प्रणाम हर किसान के नाम’ या शेतकरी उपक्रम मोहिमेबद्दल उप महाव्यवस्थापक संजय पाटील यांनी माहिती दिली.

उपस्थित शेतकरी आणि मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत, सिद्धार्थ गीते, प्रगतिशील शेतकरी विलास भगत, मिलिंद बोकील, विराज निंबाळकर, घनश्याम इंगळे, संजय पाटील, सुशांत भुंजे, मारुती पानसरे, शशिकांत शहा, शरद साळुंके, पंकज निलाखे, शैलेश ढोले, राहुल देशमुख, उमेश पाटील, लक्ष्मण वाकचौरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि ॲग्रोवन उपक्रमांची माहिती महेश चौखंडे यांनी दिली. सूत्रसंचालन ‘सकाळ’चे बातमीदार चिंतामणी क्षीरसागर यांनी तर आभार सरपंच सुनील ढोले यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com