Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : ‘एआय’द्वारे मोजता येणार भाविकांची संख्या

Palakhi Sohala 2025 : आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा प्रथमच पोलिस विभागाकडून एआय तंत्रज्ञानाचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर केला जाणार आहे.

Team Agrowon

Pandharpur News : आषाढी वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा प्रथमच पोलिस विभागाकडून एआय तंत्रज्ञानाचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे आषाढी वारीत कोणत्या भागात किती भाविकांची संख्या आहे, याची देखील एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. या प्रणालीसाठी सहा ड्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री. कुलकर्णी म्हणाले, आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येतात. येथे येणाऱ्या भाविकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.

वारीतील वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या धर्तीवर आषाढी यात्रेदरम्यान एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याची मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. एआय तंत्रज्ञानामुळे वारीतील गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. त्या ठिकाणची माहिती देखील पोलिसांना या प्रणालीच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे संभाव्य होणारा धोका टाळता येणार आहे.

आषाढी वारीसाठी लाखो भाविकांची गर्दी होती. परंतु आतापर्यंत वारीसाठी आलेल्या भाविकांची अचूक संख्या मोजता आली नाही. परंतु या प्रणालीच्या माध्यमातून आता कोणत्या भागात किती भाविकांची संख्या आहे, हे समजू शकणार आहे. वारी काळात लहान मोठ्या चोऱ्या होऊ शकतात. अशा घटना टाळण्यासाठी आरोपींचे फोटो ड्रोन कॅमेऱ्यामध्ये सेट केले जाणार आहेत.

विविध भागांत बसवले २५० सीसीटीव्ही

वारी काळातील छोट्यामोठ्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी शहराच्या विविध भागात २५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वेळीच माहिती पोलिसांना मिळणार आहे. पंढरपूर शहरातील सर्व घटना आणि घडामोडींची माहिती एकाच ठिकाणी संकलित करण्यासाठी इंटीग्रेडेट कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचेही पोलिस प्रमुख श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT