AI in Agriculture: आधुनिक शेतीसाठी मोठे गुंतवणूक धोरण : फडणवीस

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात आधुनिक शेतीसाठी एआय, सौरऊर्जा आणि सिंचन यंत्रणांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा आत्मविश्वास व्यक्त केला. २०२७ पर्यंत विदर्भाचा सिंचन अनुशेष पूर्णतः मिटवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Akola News: ‘‘शेती क्षेत्रात आधुनिकतेकडे वाटचाल करताना राज्य शासन एआय, सौरऊर्जा आणि सिंचन सुविधा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांचा खर्चही कमी होईल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अकोल्यात बुधवारी (ता.११) सुमारे २७०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यानंतर आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद सभेत ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री आकाश फुंडकर, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अनुप धोत्रे व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: कापलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीचा विचार

मुख्यमंत्र्यांनी या वेळी काटीपाटी बॅरेज, पशुसंवर्धन महाविद्यालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध रस्ते, सौरऊर्जा प्रकल्प यांसह अन्य प्रकल्पांचे लोकार्पण केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, की विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आले असून, २०२७ पर्यंत विदर्भाचा अनुशेष संपवण्याचा निर्धार शासनाने केला आहे.

CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: सिंचन प्रकल्प आणि पोकरा योजना विदर्भाचा चेहरा बदलणार?

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाद्वारे भंडाऱ्यातून बुलडाणा-वाशीमपर्यंत पाणी नेण्यात येणार आहे. यामुळे १० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येईल. पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याने जागतिक बँकेने कौतुक करीत दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘शेतीसाठी सौर ऊर्जेचा आधार’

डिसेंबर २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. विकासाची गाडी आता सुसाट वेगाने धावत आहे. शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन हेच आमचे धोरण आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com