Artificial Intelligence India Agrowon
ॲग्रो विशेष

AI in Education: ‘रयत’मध्ये पाचवीपासून पदवीपर्यंत‘एआय’चे शिक्षण : शरद पवार

Rayat Shikshan Sanstha: शरद पवार यांच्या पुढाकारातून रयत शिक्षण संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. एक जुलैपासून पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजेच एआयचे शिक्षण दिले जाणार आहे, जे भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करेल.

रमेश जाधव

Satara News: ‘‘शेतीसमोरील आव्हानांना सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्राचे आपण राबविलेले प्रयोग यशस्वी ठरले. शेतीबरोबरच प्रत्येक क्षेत्रात ए.आय.चा वापर होणार आहे. त्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये एक जुलैपासून पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ए.आय.चे शिक्षण दिले जाणार आहे,’’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या सेंटर आॅफ एक्सलन्सचे उद्‍घाटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शैक्षणिक उपक्रमाचा प्रारंभ श्री. पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे सदस्य व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, फिनोलेक्सचे संचालक रमेश ललवाणी, ‘रयत’चे संघटक डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख आदी उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे मॉडेल अन्य शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी तर ठरेलच, परंतु त्यातून जगाला निकड असणाऱ्या आधुनिक कौशल्यांची पायाभरणी आपल्या युवकांमध्ये होईल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘चीनने २००० मध्ये शाळांमधून ए.आय. तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. कोणत्याही क्षेत्रात टिकायचे असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेला आता दुर्लक्षित करता येणार नाही. बारामती येथे राबविलेला ए.आय. ऊसशेतीचा प्रयोग यशस्वी ठरला. आज ब्राझील, फ्रान्स, जर्मनी येथून लोक या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकल्पाची दखल घेतली. केंद्र सरकारला शेतीमध्ये ए.आय. तंत्रज्ञान वापराचे राष्ट्रीय धोरण तयार करायचे आहे. त्याचे मूळ बारामतीत निर्माण झाले आहे.’’ रयत शिक्षण संस्थेने केलेल्या ज्ञाननिर्मितीचे इतर शैक्षणिक संस्थांना अनुकरण करावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

श्री. ललवाणी म्हणाले की, प्रतापराव पवार यांनी कृषी क्षेत्रात ए.आय.चा वापर करणार असल्याचे सांगितल्यानंतर आम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला. शेतकऱ्यांच्या हिताचा अभिनव प्रकल्प असल्याने फिनोलेक्सने त्यासाठी ‘सीएसआर’मधून निधी दिला. ‘रयत’मध्ये शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना ए.आय.चे शिक्षण मिळणार असल्याने भावी पिढी कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही. प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT