Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : अग्रीमनंतरचा उर्वरित ७५ टक्के विमा तत्काळ द्या, अन्यथा...; स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचा इशारा

Crop Insurance Scheme Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये एक रुपयात पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यावेळी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाई देण्यात आली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने पेरण्या वाया गेल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र या २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईतील ७५ टक्के विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे ७५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईची रक्कम विमाधारकांना देण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेंडगे यांनी केली आहे. तर अग्रीम विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास २४ जूनला कार्यालयास टाळे ठोक असा इशारा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून संघटनेनं दिला आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामामध्ये एक रुपयात पीक विमा योजनेतून पीक विमा काढला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा काढला होता. मात्र गेल्या वर्षी खरीपात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढले होते.

मात्र यातील उर्वरित ७५ टक्के विमा रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अद्यापही देण्यात आलेली नाही. रब्बी हंगामामध्ये ऐन काढणीवेळी अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले. रब्बीचा पिक विमा पण सदर विमा कंपनीने अद्याप दिलेला नाही. त्यावरून शेतकरी हवालदील झाला आहे. तर आता पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी होत आहे.

यावरून स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गेल्या खरीपसह रब्बीत हंगामात काढलेले विमा नुकसान भरपाईही देण्यात आलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने यंदाच्या खरीप हंगामाचे बी-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्याला घरातील मायभगिनीचे सोने गहाण ठेवावे लागले. विमा कंपनीने वेळेत नुकसान भरपाई दिली असती ही वेळ आली नसती असे स्पष्ट केले आहे.

तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने मागील वर्षीचा खरीप व रब्बी हंगामाचा पीक विमा तात्काळ २३ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तो जमा न केल्यास स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी यांच्या वतीने २४ जून रोजी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT