Wrestling Tournament  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari : अहिल्यानगरला ‘महाराष्ट्र केसरी’,राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होणार

Wrestling Tournament : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ वी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे होत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ वी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे होत आहे. २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानात होणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातील ८०० मल्ल सहभागी होत ९०० कुस्त्या होणार आहेत. अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी ही माहिती दिली.

अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी आणि माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेबाबत माहिती देताना आमदार संग्राम जगताप, संदीप भोंडवे म्हणाले, की माती व गादी विभागातील अंतिम विजेत्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत गादीवर होईल. विजेत्यास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान कुस्त्या सुरू राहतील.

माती व गादी विभागाचे प्रत्येकी दोन मैदाने केली जातील. स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या ३६ जिल्हे, ६ महानगरपालिका असे एकूण ४२ संघ सहभागी होतील. ८४० मल्लाच्या सहभागातून ९०० कुस्त्या होतील. स्पर्धेसाठी १०० पंच, ८० पदाधिकारी असतील. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड,

पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माउली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माउली जमदाडे यांच्या सहभागासह उद्‌घाटन व बक्षीस वितरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगल, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस हे येणार आहेत असे जगताप व भोंडवे म्हणाले.

महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, गुलाब बर्डे, उपमहाराष्ट्र केसरी बापू थेटे, अनिल गुंजाळ, अर्जुन शेळके, नीलेश मदने, प्रा. डॉ. संतोष भुजबळ, प्रवीण घुले, संजय शेळके, बाळासाहेब वाघ, पै. शंकर खोसे, पै. धनंजय खोसे, पै. सुरेश आंबेकर, पै. सोमनाथ राऊत, प्रमोद गोडसे, उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले उपस्थित होते.

अहिल्यानगरला चौथ्यांदा स्पर्धा

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची कुस्ती स्पर्धा असून, पहिली महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा १९५३ मध्ये झाली. त्या वेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनिटांत झोळी डावावर चीतपट मारले. त्या वेळी तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चॅम्पियन (केसरी) ट्रॉफी देण्यात आली.

सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा, रोख रक्कम मिळू लागली. अहिल्यानगरला चौथ्यांदा ही स्पर्धा होत आहे. यापूर्वी अहिल्यानगरच्या स्‍पर्धेत चंबा मुतनाळ (१९६८), रावसाहेब मगर (१९८८), विजय चौधरी (२०१४) विजेते होते. यंदा विजेत्यास रोख पारितोषिक, मानाची चांदीची गदा या बरोबरच चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Buffalo Farming: म्हैसपालनात स्वच्छता, चारा, आरोग्यावर भर

De-Dollarization: डॉलरच्या दबदब्याची अस्ताकडे वाटचाल

Fertilizer Shortage: उशिरा आलेली जाग

Lumpy Skin Disease: सिंधुदुर्गाला ‘लम्पी’चा विळखा

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाला मिळणार ‘लाडकी बहीण’चा हप्ता

SCROLL FOR NEXT