Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : क्रीडा संकुल प्रस्तावास मान्यता देऊ : फडणवीस

Maharashtra Wrestling Tournament : कुस्ती हा आपला प्राचीन खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कुस्ती खेळास राजाश्रय दिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले.
Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament
Chhatrapati Shivarai Kesari Wrestling TournamentAgrowon
Published on
Updated on

Nagar News : कुस्ती हा आपला प्राचीन खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कुस्ती खेळास राजाश्रय दिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले.

नगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नगर येथे रविवारी (ता.२३) छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament
Nagar Market Committee Election : नगर बाजार समिती निवडणुकीत अनेक ठिकाणी दुरंगी-तिरंगी लढती

फडणवीस म्हणाले, ‘‘कुस्ती हा आपला प्राचीन खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम या खेळाला राजाश्रय दिला. त्यानंतर बंद पडलेल्या तालीम पुनरुज्जीवित करून कुस्तीला पाठबळ देण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी कुस्ती विजेत्यांना चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली‌.

नगरमध्ये सोन्याची गदा देण्याच्या परंपरेला सुरवात झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर पदक मिळाले नाही‌. पुढील ऑलिंपिक विजेता महाराष्ट्राच्या मातीतूनच झाला पाहिजे. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पैलवानाचे मानधन ३ हजारांहून १८ हजार रुपयांपर्यंत वाढविले आहे.

तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरी यांना थेट पोलिस उपअधीक्षक पदाची सरकारी नोकरी देण्यात आली‌‌. लवकरच नगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल.’’

महेंद्र गायकवाडला सोन्याची गदा

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यभरातून जवळपास एक हजार कुस्तीपटू सहभागी झाले होते‌. स्पर्धेतील ३५ लाख रुपये किमतीची अर्धा किलोची सोन्याची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांनी पटकावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com