
Parbhani News : २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्याला ५४८ कोटी ५९ लाख रुपयांवर निधी मंजूर आहे. परंतु ई केवायसी केल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटला तरीही अद्याप थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे अर्थसाहायाची रक्कम बँक खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अतिवृष्टीच्या अर्थसाह्यापासून वंचित आहेत.
परभणी जिल्ह्यातील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार निधी वितरणास ऑक्टोबर महिन्यात मंजुरी दिलेली आहे. तलाठ्यांमार्फत बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात आहेत.
विशिष्ट क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांनी ई केवायसी केल्यानंतर अर्थसाह्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी महा आय.टी. पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या आणि अर्थसाह्याची रक्कम अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोमवार (ता. ६) पर्यंत ३ लाख ७३ हजार ६०८ शेतकऱ्यांसाठी ४३७ कोटी ६० लाख ५३ हजार ३७७ रुपये (७९.७७ टक्के) रक्कम महा आय. टी. पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, ११० कोटी ९९ लाख ३५ हजार ८३५ रुपये रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याचे बाकी होते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वाटप लांबणीवर पडले होते.
परंतु त्यानंतर ई केवायसी प्रक्रिया सुरू झाली. पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकरी याद्या व अनुदानाची रक्कम यांची माहिती आहे. परंतु डीबीटीद्वारे अर्थसाह्याची रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्येची माहिती महसूल विभागाकडे नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
परभणी जिल्हा अतिवृष्टी अर्थसाह्य अपलोड स्थिती
तालुका एकूण बाधित शेतकरी पोर्टलवरील शेतकरी पोर्टलवर अपलोड रक्कम टक्केवारी
परभणी ९७८५२ ६२५८२ ८२ कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये ८०.०३
जिंतूर ८५२३१ ६५५४५ ८६ कोटी १ लाख ७ हजार रुपये ७९.००
सेलू ५६०६१ ४५१४४ ६२ कोटी २५ लाख ८० हजार रुपये ८७.२१
मानवत ३८४९६ ३१०४४ ३८ कोटी ३१ हजार रुपये ९०.२५
पाथरी ४७८०७ ३४०५० ४१ कोटी ७ लाख ९१ हजार रुपये ७०.७९
सोनपेठ ३२७८४ २४५६९ २८कोटी ७० लाख ९६हजार रुपये ८२.८१
गंगाखेड ६२६७३ ३३०५३ २८ कोटी २० लाख ९४ हजार रुपये ६९.६५
पालम ४८५२७ ३०५१९ २९ कोटी ७४ लाख ४७ हजार रुपये ७०.६९
पूर्णा ६०३३० ४७१०२ ४१ कोटी २० लाख ९ हजार रुपये ८५.८४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.