Market Bulletin Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : टोमॅटोचे भाव दोन आठवड्यांमध्येच निम्म्यावर

Market Bulletin : टोमॅटोचा बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्यापेक्षा कमी झाले. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली.

Team Agrowon

1. यंदा कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता

देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिर आहेत. वायद्यांमध्ये मात्र दरात चढ उतार सुरु आहेत. बाजार  समित्यांमध्ये कापसाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. कापसाला मागणी वाढल्याने भावात सुधारणा झालेली दिसते. काही जिनिंग आता हंगामाच्या आधी मेंटनन्सवर जात आहेत. पण सरकट खरेदी बंद नाही. यंदा पिकाची स्थिती पाहता कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.

2. सोयाबीनची आवक काहीशी कमी

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीन आवक काहीशी कमी झाली. त्यातच नव्या पिकाला पावसाअभावी फटका बसत आहे. पण आणखी काही दिवस सोयाबीन बाजार याच पातळीवर दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
 

3. कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. त्यामुळे अनेक बाजारांमध्ये कांदा भाव क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत कमी झाले. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी झाली. यामुळे भाव वाढले होते. पण आज कांदा भाव सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान होते. पण पुढील काळात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याचे भाव जास्त दिवस कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असे जाणकारांना सांगितले.

4. गव्हाच्या भावात आणखी वाढ

देशातील बाजारात गव्हाचे भाव वाढतच आहेत. केंद्राने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी निर्यातबंदी केली. स्टाॅक लिमिट लावले. स्टाॅकमधील गव्हाची विक्रीही सुरु केली. पण भाव कमी होण्याऐवजी वाढलेले दिसतात. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातील सण आणि दुष्काळी स्थिती यामुळे गव्हाच्या भावात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

5. टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली

टोमॅटोचा बाजार आता मोठ्या प्रमाणात दबावात आला. टोमॅटोचे भावही निम्यापेक्षा कमी झाले. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली. सध्या देशातील बाजारात नव्या टोमॅटोची आवक वाढली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील बाजारात आवक जास्त दिसते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तूट कमी झाली. परिणामी भावही कमी झाले. देशातील अनेक भागांमध्ये आता नव्या मालाचा तोडा सुरु झाला. हा माल बाजारात येतोय. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक वाढली. यामुळे टोमॅटोचे भाव सध्या ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत.

सध्या बाजारातील आवक वाढली पण सुरु असलेल्या हंगामालाही मोठा फटका बसला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक नेहमीप्रमाणे दाटण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे टोमॅटोचे भाव कमी जास्त होताना दिसत असले तरी त्यात मोठी घट होण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी सांगितले. सध्या टोमॅटोसह सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी टोमॅटो लागवडी अडणीत आल्या. अनेक भागांमध्ये ही स्थिती आहे. तसेच जोरदार पाऊस झाल्याशिवाय पिकाला आधार मिळणार आहे. यामुळे बाजारातील आवक वाढीवर मर्यादा आहेत, असे व्यापारी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?

Unseasonal Rain Damage: धाराशिव जिल्ह्यात दीड हजार हेक्टरला पूर्वमोसमीचा फटका

Farmers Agitation: अन्नत्यागातून शेतकऱ्यांप्रति सहवेदना

Paddy Disease: धान पिकावर करपा रोग

SCROLL FOR NEXT