Onion Export Duty : मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. त्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून कांद्याचे भाव पाडले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू करून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांसाठी जगाचे मार्केट बंद केले, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांनी रविवारी (ता. २०) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारच्या धोरणावर टिका केली. कांदा प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले की, केंद्राने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत.त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
केंद्र सरकारने शनिवारी कांदा निर्यातीवर शुल्क वाढवणारी अधिसूचना जारी केली. यामध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. दरम्यान, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. राज्यात शेतकरी संघटना आणि काॅग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सटाणा नाशिक येथे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या पुतळाला जोडे मारो आंदोलन केले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारच्या अधिसूचनेची होळी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.