Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : ‘भात तेथे समृद्धी’ आणण्याचे कृषी विद्यापीठाचे लक्ष्य

Agriculture Minister : भात तेथे गरिबी हे पूर्वीचे चित्र बदलवून ‘भात तेथे समृद्धी’ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.

Team Agrowon

Ratnagiri News : भात तेथे गरिबी हे पूर्वीचे चित्र बदलवून ‘भात तेथे समृद्धी’ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार विद्यापीठातील संचालक, शास्त्रज्ञ आणि विविध शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत बैठक विद्यापीठाच्या कुलगुरू परिषद दालनात झाली.

या वेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. जगदीश कदम, वनस्पती जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष सावर्डेकर, तांत्रिक अधिकारी डॉ. मंदार खानविलकर, वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. मकरंद जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. संजय भावे म्हणाले, की पंचक्रोशीचा कायापालट होण्यासाठी यापुढे कोकणातील प्रत्येक मंडळात ५० ते १०० दर्दी शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्याचा मानस आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी सेंद्रिय शेतीत संशोधन केंद्राची वाटचाल या विषयावर नेटके सादरीकरण करताना विद्यापीठात सेंद्रिय शेतीवर सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. संजय तोरणे यांनी सेंद्रिय मालाची बाजारपेठ आणि उपाययोजना या विषयावर मार्मिक विवेचन केले तर डॉ. मकरंद जोशी यांनी सेंद्रिय शेतीमध्ये जैविक खते व बुरशीनाशकांचा प्रभावी वापर या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

शेतकरी हाच सर्वांत मोठा शास्त्रज्ञ

पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांकडून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी तसेच त्यांचा आदर्श अन्य शेतकऱ्यांनी अवलंबविण्यासाठी अशा बैठकांची गरज आहे.

विद्यापीठाने शिफारस केलेल्या तंत्रज्ञानामध्ये स्वतःचे तंत्र वापरून व त्यास अनुभवाची जोड देऊन जो उत्कर्ष साधला. शेतकऱ्यांची ती यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत व विद्यापीठापर्यंत पोहोचणे आवश्यक असून ‘शेतकरी हाच सर्वांत मोठा शास्त्रज्ञ आहे’, असे कुलगुरू भावे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT