Farmer Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan : अज्ञानाला कर्ज दिलेच कसे?

Agriculture Loan : एका गावात रामदास नावाचा एक शेतकरी पत्नी व त्याच्या लहान मुलासोबत राहत होता. रामदासची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. रामदासची परिस्थिती वाईट जरी असली, तरी तो व्यवहारात चतुर होता.

शेखर गायकवाड

Loan To Farmer : एका गावात रामदास नावाचा एक शेतकरी पत्नी व त्याच्या लहान मुलासोबत राहत होता. रामदासची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. रामदासची परिस्थिती वाईट जरी असली, तरी तो व्यवहारात चतुर होता. परिस्थिती नसताना गरजेपोटी बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय रामदासने घेतला.

रामदासची ऐपत नसल्यामुळे त्याला कोणत्याच बँकेकडून कर्ज मिळणार नव्हते. त्याची अवस्था बघून व रामदासला मदत करण्याच्या हेतूने तालुक्यातील एका मोठ्या पुढाऱ्याने एकात्मिक ग्रामीण विकास योजनेतून कर्ज मंजूर करण्याचा प्रयत्न केला.

रामदासने स्वतःच्या व अज्ञान मुलाच्या नावावर कर्ज काढण्यासाठी प्रकरण तयार केले. रामदासच्या शेताच्या सातबारावर रामदास व मुलगा मयूर अपाक रामदास अशी नावे होती. बँकेने सुद्धा रामदासची गरज ओळखून मदत करण्याच्या हेतूने कर्ज प्रकरण ताबडतोब मंजूर केले.

बराच कालावधी उलटल्यानंतर जेव्हा कर्ज फेडायची वेळ आली तेव्हा बँकेतील लोक रामदासच्या घरी गेले व रामदासला आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरायला सुरुवात का केलेली नाही, अशी विचारणा केली.

रामदास बँकेच्या साहेबाला म्हणाला, ‘‘साहेब, तुम्ही माझ्या लहान मुलाच्या नावावर कर्ज दिलेच कसे? मी फक्त माझ्या हिश्शाचे कर्ज फेडणार. लहान मुलाच्या नावावरील कर्जाची तुम्हाला वसुली करता येणार नाही.

उलट मीच आता बँकेच्या वरिष्ठांकडे तुम्ही अज्ञान व लहान मुलाच्या नावावर कर्ज दिले म्हणून तुमची चौकशी करण्यात यावी असा अर्ज करणार आहे !’’

सुरुवातीला सगळे कर्ज घेणारे लोक कर्ज फेडायची वेळ आली, की असेच वागतात हे लक्षात घेऊन बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. काही महिन्यांनंतर मात्र रामदास तहसील कार्यालयासमोर बँकेच्या अधिकाऱ्यांची बेकायदेशीर कर्ज मंजूर केल्याबद्दल चौकशी करावी, अशी मागणी घेऊन धरणे आंदोलनास बसला.

सांगावयाचे तात्पर्य म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी लोक कायद्याचा वापर करतात. जेव्हा स्वतःला गैरसोयीचे असेल तेव्हा कायदा चुकीचा असतो, हे सिद्ध करून दाखवायचा मनुष्यप्राणी नेहमी प्रयत्न करतो हेच खरे!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Innovation: धडा मातीचा; वारसा उद्योजकतेचा !

International Women Farmer Year: ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आशादायी

Farmer Success Story: वीस वर्षांपासून शेतीत ‘बिनहाती’ झुंज...

Maharashtra Winter Weather: नववर्षात गारठा कायम राहणार

IAS Ravindra Thackeray: माहिती अधिकाराचे ज्ञान अधिकाऱ्यांनाच नाही

SCROLL FOR NEXT