Shekhar Gaikwad : शेतकरी गणपतची चलाखी

एका गावात गणपत नावाचा एक शेतकरी राहत होता. गावात सरकारकडून धरण बांधायचे काम सुरू होते. धरणाचे काम पूर्ण होत आले होते तरीसुद्धा धरणात बुडणाऱ्या काही जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नव्हता.
Land Sealing
Land SealingAgrowon
Published on
Updated on

शेखर गायकवाड

एका गावात गणपत नावाचा एक शेतकरी राहत होता. गावात सरकारकडून धरण बांधायचे काम सुरू होते. धरणाचे काम पूर्ण होत आले होते तरीसुद्धा धरणात बुडणाऱ्या काही जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नव्हता.

जमिनीचा मोबदला न मिळाल्यांमध्ये गणपतही होता. गणपतने जमिनीची मोजणी पूर्ण होण्याआधी एका रात्रीत शेकडो आंब्याच्या कोयी शेतजमिनीत पुरल्या. काही दिवसानंतर आंब्याच्या कोयी उगवून आंब्याची लहान लहान रोपे आली.

ज्यावेळी जमिनीची गणपतने सरकारकडून आंब्याच्या झाडांचे मूल्यांकन मिळविण्याकरिता सरकारला निवेदन दिले. सरकारने गणपतच्या जमिनीचा मोबदला मिळण्याच्या त्याच्या निवेदनावर काहीही हरकत घेतली नाही.

Land Sealing
Fruit Crop Insurance : फळपीक विम्यासाठी ई-पीकपाहणी सक्तीची?

शेवटी गणपतला कलेक्टरांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आली. गणपत कलेक्टर कचेरीसमोर उपोषणाला बसला असता त्याने निवेदनात असा उल्लेख केला, की मला या आंब्याच्या झाडांपासून पुढची १०० वर्षे कोट्यवधी रुपये मिळाले असते.

परंतु गावात राहणारा एक चतुर शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने जमीन मोजणीच्या एक महिना अगोदर गणपतला शेतजमिनीत रात्रीच्या वेळी आंब्याच्या कोयी जमिनीत टाकतानाचे फोटो काढले होते.

रात्री जमिनीत कोयी टाकतानाचे फोटो पुरावा म्हणून त्या शेतकऱ्याने कलेक्टरांना एक लेखी तक्रार अर्ज सुद्धा दिला होता. हा सगळा प्रकार कलेक्टरांनी चौकशी करून उघडकीस आणल्यानंतर मात्र गणपतचे धाबे दणाणले. भूसंपादनाच्या प्रकरणापूर्वी जमिनीत झाडे नसल्याची बाब सॅटेलाइट इमेजेसमध्ये पण उघड झाली.

सांगायचे तात्पर्य म्हणजे सरकारकडून पैसे मिळणार म्हटल्यावर आंब्याची रोपे लावून फक्त झाडांचेच नाही तर पुढच्या मिळणाऱ्या उत्पन्नाचेही पैसे उकळणारे सुद्धा काही जमीन मालक आहेत !

ई-मेल - shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com