Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Policy : सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थांपायी शेतकऱ्यांच्या ताटात मातीच कालवली

Milk Rate : दुधाला भाव नाही की कोणतेही संरक्षण नाही. दूध व्यवसाय तोट्याचा वाटू लागला आहे. गेल्या दोन वर्षात ७० ते ८० टक्के शेती अवजारे, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते, बियाणे आणि इतर निविष्ठांचे दर वाढले. परिणामी शेतीकामे रखडले.

डॉ. सोमिनाथ घोळवे

Rain Update : जून महिना संपत आला आहे. तरीही हंगामातील पाऊस नाही. परिणामी पिण्याचे पाणी टंचाई आहे. शिवाय २ टक्के पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस आणि पेरण्या नसल्याने शेतकऱ्यांचा धीर सुटू लागला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही नेतृत्व आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटायला तयार नाही.

कोरडवाहू परिसरात पाऊस पुरेसा नसल्याने पिण्यासाठी पाणीटंचाई आहे, त्यामुळे शेतीला पाणी असण्याची शक्यता खूपच दूरची.

पेरणी करायला पीककर्ज नसल्याने बियाणे-खते खरेदीला पैसे नाहीत. सावकारांच्या शेतकऱ्यांना दारात उभे केलंय. शेतमालाला भाव नाही, ३/४ रुपये किलोने कांदा आणि २५/२८ रुपयाने ज्वारी विकावी लागत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस आणि सोयाबीन रास्त भाव मिळाला नसल्याने पडून आहे. जमिनीचे तुकडीकरण झाल्याने बैल पाळता येईना. पशुधन कमी होत चालले आहे.

दुधाला भाव नाही की कोणतेही संरक्षण नाही. दूध व्यवसाय तोट्याचा वाटू लागला आहे. गेल्या दोन वर्षात ७० ते ८० टक्के शेती अवजारे, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते, बियाणे आणि इतर निविष्ठांचे दर वाढले. परिणामी शेतीकामे रखडले.

खरीप पिकांची एमएसपी (किमान आधारभूत मूल्य) जाहीर झाले, ते देखील महागाईच्या तुलनेत कमी आहे. मायक्रो फायनान्स आणि खाजगी सावकार शेतकरी, सामान्यांच्या-गरिबांच्या दारात येऊन बसलेले आहे.

घरातील तरुणांना रोजगार नसल्याने शेतकरी काळजावर दगड ठेवून शहरात बळजबरीने काम -धंदा करण्यासाठी पाठवत आहेत. तरुणांच्या लग्नाचे प्रश्न तर खूपच भयंकर झाला आहे. शेतमाल विक्रीसाठी चांगली बाजारपेठ नाही की हक्काचे केंद्र नाही. असे किती प्रश्न सांगावेत. असेच प्रश्न आहेत शेतमजुरांचे, असंघटित मजुरांचे, कष्टकऱ्यांचे, भूमिहीनांचे, वंचितांचे, गरिबांचे.

तळागाळातील वर्गाचे सर्व प्रश्न सोडवण्याचे नाव नाही. या प्रश्नांची चिंता सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन कधी करतील. हे प्रश्न वर्षानुवर्षे हे केवळ राजकीय स्वार्थातून घोळत ठेवले जाणार आहेत. सर्वसामान्यांचे केवळ १० टक्के तरी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा दिलासा वाटेल. पण या प्रश्नांची चिंता ना सत्ताधाऱ्यांना, ना विरोधकांना..

सत्तेच्या स्वार्थापेक्षा थोडंस शेतकरी, कष्टकरी, मजूर, वंचित आणि मागास समाज घटकांच्या पोट-पाण्याचे आणि जगण्याचे मार्ग कसे सुलभ होतील याचे विचार कधीतरी केंद्रस्थानी आणून पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT