Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?
Food Diversity: आपल्या देशात आहारामध्ये किती विविधता आहे! ती त्या त्या नैसर्गिक-भौगोलिक प्रदेशानुसार विकसित झाली आहे. ती संपवून सारेच एकसुरी कशासाठी बनायचे? किंबहुना, ही विविधता टिकवायला हवी आणि वाढवायलाही हवी. पण आपण आपल्या आहारात अनायसे असलेली विविधता संपवून सपाटीकरणाकडे का जात आहोत? इतकेच नव्हे तर कोण काय खातो यावरून सुसंस्कृतपणा ठरवण्याकडे किंवा कोणी काय खायचे हे नियंत्रित करण्याच्या दिशेने आपण चाललो आहोत. यात सांस्कृतिक अतिक्रमणाचाही अजेंडा स्पष्ट दिसतो.