Team Agrowon
पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पेरणी करताना कोणती या गोष्टीची काळजी घ्या.
पेरणी करताना एकाच पिकाची पेरणी न करता आंतरपीकाची लागवड करावी. यामुळे एक पीक हाताचे गेले तर दुसरे पीक ही जोखीम कमी करतं.
पेरणीपूर्वी उताराला आडवी खोल सरी काढा.या सरीला उतार दिल्यास पाऊस जास्त झाल्यास अतिरिक्त पाणी शेताबाहेर जात.
काळ्या खोल व भारी जमिनीमध्ये बांधाला काटछेदाचे चर घेऊन त्यातील माती काठावर टाकून बांध तयार करावा. तेथे पावसाचे साठलेले पाणी पिकासाठी वापरता येतं.
उताराच्या जमिनीमध्ये सरीच्या लांबीवर ५ ते ७ मीटर अंतरावर सऱ्यांमध्ये आडवे वरंबे तयार करावेत. अशा सरीमध्ये जमा झालेले पाणी उताराच्या दिशेने न वाहता जमिनीतच मुरण्यास मदत होते.
पिकाच्या पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा उपयोग करावा. या यंत्रामुळे बियाणे, खतामध्ये बचत होते, उत्पादनात वाढ होते.
जलसंधारण साठी १ मीटर उंचीपर्यंतचा बांध आणि आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याकरिता सांडव्याची व्यवस्था करावी.
जमिनीत न मुरलेले पावसाचे अतिरिक्त पाणी पृष्ठभागावरून वाहून जाते. हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्याद्वारे साठवून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणता येते.