Kolhapur Agriculture Department agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Agriculture Department : कोल्हापुरात कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

Bribe Case Agri Department : सेंद्रिय खतांच्या विक्री दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात आले.

sandeep Shirguppe

Agriculture Officer Bribe Kolhapur : कोल्हापुरात एका कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सेंद्रिय खतांच्या विक्री दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना कृषी अधिकाऱ्याला पकडण्यात आले.

सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे. तो वर्ग दोनचा अधिकारी असून राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी कारवाई करत जाधवला अटक केली. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.

कारवाईबाबत नाळे यांनी दिलेली माहिती अशी तक्रारदाराने बियाणे, खते आणि औषधांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी ऑनलाईन आणि ऑफलाईने अशा दोन्ही पद्धतीने जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती. अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याबद्दल सुनील जाधव याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली. चर्चेनंतर नऊ हजारांवर तडजोड झाली.

त्यानुसार काल(ता.२८) रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास जाधवला तक्रारदाराकडून लाच घेताना अटक केली. त्यानंतर पथकाने जाधव याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेतली. त्यानंतर सातारा येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बबरगेकर यांच्यासह अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.

ठिकाण शेवटपर्यंत गुलदस्त्यात

लाच देण्याचे आणि घेण्याचे निश्चित झाले होते. सलग सुट्ट्यांनंतर आज मंगळवारी लाच रक्कम देण्याचेही ठरले; मात्र नेमके कुठे द्यायची, हे जाधव याने सांगितले नव्हते. त्यामुळे कारवाई कुठे करायची, याची खात्री तक्रारदार आणि अधिकाऱ्यांनाही नव्हती, मात्र सायंकाळी पाच वाजता कार्यालय सुटल्यावर मार्केट यार्ड येथे तक्रारदाराला बोलविले आणि जाधव छाप्यात अडकला. तक्रारदार जैविक आणि सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ आहेत.

तक्रारी द्या !

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या वतीने एजंट, शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते. संबंधित तक्रारदारांनी शनिवार पेठेतील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT