Manikrao Kokate agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : 'खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुविधा द्या'

Nashik District Collector Office : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मंगळवारी (ता. २०) सकाळी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

Team Agrowon

Nashik Kharip Season : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. खतांचे लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मंगळवारी (ता. २०) सकाळी जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, प्राचार्य रामेती शिवाजी आमले, स्मार्ट नोडल अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती व घडीपत्रिकेसह कृषी विभागाच्या व्हॉटसॲप चॅनेलचे आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘आरसीएफ’तर्फे विक्रेत्यांना पीओएस मशिनचे वितरण करण्यात आले.

कोकाटे म्हणाले, की हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, अशी दक्षता घ्यावी. आमदार बनकर, खोसकर व खासदार वाजे यांनी या वेळी सूचना केल्या.

...अशी आहे कृषी विभागाची तयारी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, की जिल्ह्यात ६ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे. त्यासाठी बी-बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबरोबरच आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी या विषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात विभागस्तरावर दोन, जिल्हास्तरावर ६, उपविभागस्तरावर ८ व तालुकास्तरावर ३० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT