
Nashik News : जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस, यापूर्वी झालेल्या गारपिटीने गेल्या १४ दिवसांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास सहा हजार हेक्टरवर नुकसान असल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
त्यातच दोन दिवसांत (ता. १७ व ता. १८) जिल्ह्यात झालेल्या मुसळधारेने कहर केला. त्यामुळे कांदा, आंबा, टोमॅटोसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रविवारी (ता. १८) दुपारनंतर झालेल्या पावसामुळे सिन्नर, चांदवड, येवला, निफाड तालुक्यांना पावसाने झोडपले. यामध्ये अनेक ठिकाणी काढणी करून शेतात झाकून ठेवलेला कांदा भिजला.
प्रामुख्याने कंदवर्गीय भाजीपाल्याचे मोठे नुकसान आहे. अनेक ठिकाणी काढण्यासाठी आलेला आंबा पडल्याने नुकसान वाढते आहे. तर वातावरणातील बदलांमुळे साठवलेला कांदा सडू लागला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात नांदूर शिंगोटे, दोडी, दापूर, कासारवाडी, नळवाडी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडी पाण्याखाली गेल्या होत्या. तर मुसळधारेने शेतातून अनेक क्षेत्रातून पाणी वाहिले.
परिसरात कांदा काढणी सुरू आहे. त्यात आलेल्या पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. शिवाय या भागातील कांद्यासह कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या कांदवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. यासह ढगाळ वातावरण व पावसामुळे भाजीपाला पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची स्थिती आहे.
येवला तालुक्यातील पश्चिम भागात प्रामुख्याने पाटोदा, कातरणी, साताळी, भिंगारे, नेउरगाव, जळगाव, मुखेड, मानोरी आदी गावांत झालेल्या पावसामुळे शेतातून पाणी वाहिले. यात रब्बी हंगामातील उशिराने झालेल्या लागवडी ज्यांच्यामधील कांदे काढणे बाकी आहे, अशा अनेक ठिकाणी नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.