Assembly Monsoon Session 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Agriculture Minister Absent: राज्यात खरिपाचा पेरा वाया जाण्याची भीती, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, लिंकिंगचा मारा आणि अन्य कृषी विषयक प्रश्नांचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मारा सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र अपवाद वगळता कामकाजाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

बाळासाहेब पाटील

Pune News: राज्यात खरिपाचा पेरा वाया जाण्याची भीती, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट, लिंकिंगचा मारा आणि अन्य कृषी विषयक प्रश्नांचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मारा सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र अपवाद वगळता कामकाजाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

३० जून रोजी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले मात्र, अपवाद वगळता कोकाटे सभागृहात आलेच नाहीत. परिणामी विधानसभेतील विरोधकांचा २९३ चा प्रस्ताव, विधान परिषद आणि विधानसभांमध्ये उपस्थित होणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचनांवरील चर्चेवेळी कोकाटे यांची अनुपस्थिती विरोधकांसह सत्ताधारी आमदारांना खटकू लागली आहे.

कर्जमाफी, नुकसानीचे पंचनामे आदी विषयांवर वादग्रस्त वक्तव्ये कोकाटे यांनी केली होती. त्याचे पडसाद सभागृहात उमटले. विरोधकांनी संधी मिळेल तेथे कोकाटे यांच्या विधानाचा संदर्भ देत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोकाटे यांनी सभागृहकडे पाठ तर फिरविली नाही ना? असा सवाल आता केला जात आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधकांच्या २९३ च्या प्रस्तावावर चर्चा करताना कृषिमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी गोंधळ घातला. कोकाटे हे त्याचवेळी मंत्रालयात माजी आमदार बच्चू कडू यांच्या विविध मागण्यांबात बैठक घेत होते. वास्तविक बैठक घेण्याचे नियोजन असेल तर कृषी विभागाच्या चर्चेदरम्यान कृषिराज्यमंत्री तरी उपस्थित राहण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तेही अनुपस्थित होते.

बच्चू कडू यांच्याशी झालेल्या बैठकीतून त्यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी केला. त्या वेळी वेळ मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी कोकाटे दिल्लीला रवाना झाले. ऐन अधिवेशन काळात ते दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. मंगळवारी (ता. ८) ते मुंबईत आले. सध्या पेरण्यांचा हंगाम संपून उगवणीचा काळ आहे. त्यामुळे बोगस बियाणांबाबत राज्यभर तक्रारी येत आहेत.

त्याचे पडसाद सभागृहात उमटत आहेत. मंगळवारी बोगस बियाणांबाबत लक्षवेधी सूचनेवर ५० मिनिटांहून अधिक काळ विधानसभेत गोंधळ सुरू होता. वास्तविक राज्यमंत्री उत्तर देत असताना त्यांच्या आवाक्याबाहेर एखादी बाब जात असेल तर कॅबिनेट मंत्री सभागृहात येऊन बाजू सांभाळत असतात. मात्र, मंगळवारी भाजपचे सदस्य तुटून पडत असताना जैस्वाल पूर्णपणे एकटे पडले होते. त्यामुळे कृषी विभागाशी संबधित लक्षवेधी राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली.

स्पष्टवक्तेपणाचा फटका

माणिकराव कोकाटे यांनी सूत्रे घेतल्यानंतर बैठकांचा धडका लावला. अधिकाऱ्यांकडून माहिती जमा करून विभाग समजून घेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांचे शांतपणे ऐकूण घेणारे मंत्री शेतकऱ्यांबाबत स्पष्टपणे कसे काय बोलू शकतात, असा सवाल केला जात आहे. अनेकदा मोकळेपणाने बोलण्याच्या नादात त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्या मुद्द्यावरून विरोधकांनी अधिवेशनात घेरण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक हा मुद्दा त्यांना निकाली काढता आला असता, पण त्यांनी चर्चेकडे पाठ फिरवून कोकाटे यांनी काय मिळविले अशी चर्चा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Dispute : ‘एनएमआरडीए’च्या कारवाईला हायकोर्टाचा दणका

Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

Onion Market : आठवड्याहून जास्त काळ बाजार समित्यांचे काम राहणार बंद

APMC Land : बाजार समितीची जमीन कवडीमोलाने विकण्याचा घाट

Palm Cultivation: यंदा देशातील पाम लागवड क्षेत्रात ५२,११३ हेक्टरने वाढ, 'या' राज्यांत सर्वाधिक

SCROLL FOR NEXT