Agriculture Graduate Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Graduate Protest : परभणीत कृषी पदवीधरांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

Team Agrowon

Parbhani News : सर्व पात्र कृषी आचार्य पदवीच्या (पीएचडी) विद्यार्थ्यांना कोणतीही पात्रता परीक्षा न घेता सरसकट सारथी, बार्टी व महाज्योती संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता. ५) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढला. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

सारथी, बार्टी व महाज्योती संशोधन अधिछात्रवृत्ती पात्रता परीक्षा न घेता सरसकट (पीएचडी फेलोशीप) बॅच २०२३-२४ साठीची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करून सर्व पात्र संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनींना विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून संशोधन अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) अदा करण्यात यावी.

संशोधन अधिछात्रवृत्ती न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर अर्थसाह्य पुरवणारी ‘कमवा आणि शिका’ या धर्तीवर योजना कार्यान्वित करण्यात यावी. आचार्य पदवी (कृषी) अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्रदान करण्यात यावा.

कृषी विषय शालेय शिक्षणामध्ये शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अटी न लावता कृषी पदवीधरांची नियुक्ती करण्यात यावी, या मागण्यांसाठी कृषी पदवीधरांनी मोर्चा काढला. या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्‍वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या...

कृषी सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक व वरिष्ठ संशोधन सहायकपदांची भरती करावी.

वरिष्ठ संशोधन सहायक या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता ही पदव्युत्तर पदवी आहे. त्यामुळे अतिरिक्त मूल्यांकन, गुणांकन पद्धतीचा वापर करू नये.

विद्यापीठातील सर्व वसतिगृहात वायफाय, आरओ फिल्टर, सोलार अभ्यासिका सुविधा तत्काळ द्या.

विद्यापीठ स्तरावर वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास तत्काळ मंजुरी देण्यात यावी. बससेवा सुरू करावी.

पदवी विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहात धुलाई यंत्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

ग्रामसेवक, तलाठी पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता कृषी पदविका व पदवीधर करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT