MGNREGA Orchard Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agriculture Department : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल ठरला असून महाराष्ट्रदिनी बुधवारी (ता.१) शासकीय कार्यक्रमात कृषी विभागातील कर्तबगार अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.

Team Agrowon

Buldhana News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल ठरला असून महाराष्ट्रदिनी बुधवारी (ता.१) शासकीय कार्यक्रमात कृषी विभागातील कर्तबगार अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. जिल्ह्यात सन २०२३-२४ वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत १४८५ हेक्टर आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत १०३५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे.

संग्रामपूर या आदिवासी बहुल तालुक्यात फळबाग लागवड सर्वाधिक झाली. या तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला. संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांच्या नियोजनातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात लाभार्थ्यांनी ४५७ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली.

यामध्ये केळी व संत्रा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात फळबाग लागवडीत संग्रामपूर तालुक्याला प्रथम क्रमांक संपादन केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते बुधवारी तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल बनसोडे, संग्रामपूर तालुक्यातील कृषी सहायक रवींद्र बाळासाहेब जाधव (वरवट बकाल येथे संत्रा व केळी पिकांची ५२ हेक्टर क्षेत्रावर लागवड),

सोनाळा कृषी सहायक वासुदेव भगवान भोई यांनी गावात ४० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड उद्दिष्ट पूर्ण करून द्वितीय क्रमांक तसेच मेहकर कृषी कार्यालयातील कृषी सहायक शंकर सदाशिव वाघमारे यांनी तारशिव, थार व खुदनापूर या गावात संत्रा या पिकाची ३६.६० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड उद्दिष्ट पूर्ण केले.

अशी झाली लागवड

महात्मा गांधी रोजगार हमी योजना १४८५ हेक्टर

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना १०३५ हेक्टर

एकूण लागवड २५२० हेक्टर

शेतकऱ्यांनी फळबाग योजनेसाठी पुढे यावे : ढगे

पारंपरिक पिकांपेक्षा अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी फळबागा उपयोगी आहेत. हे लक्षात घेत जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT