Orchard Cultivation : ‘मनरेगा’तून फळबाग लागवडीला प्रोत्साहन

MNGREGA : अकोला जिल्ह्यात या वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून आतापर्यंत साडेपाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे.
MNGREGA
MNGREGA Agrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला जिल्ह्यात या वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून आतापर्यंत साडेपाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. विशेष करून अकोट, तेल्हारा या दोन तालुक्यात लागवड चांगली असून मूर्तीजापूर, बाळापूर हे तालुके तुलनेने बऱ्याच पिछाडीवर पडलेले आहेत.

पारंपारिक पिकांपेक्षा फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात हे आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यासाठी राबवली जाते. जॉबकार्ड असलेल्यांना रोहयोमधून फळबाग उभी करण्यासाठी अनुदान मिळते.

MNGREGA
Orchard Cultivation : पाणी नसल्यामुळे फळबाग लागवडीत खोडा

जिल्ह्यात यावर्षी एक हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे लक्षांक दिलेला आहे. यासाठी ९५३ शेतकऱ्यांनी अर्जही केले. प्रशासनाने अर्जांची छाननी करून ८३९ हेक्टर क्षेत्रासाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्रदान केलेली आहे. यापैकी आतापर्यंत ५५८ हेक्टरवर लागवड झालेली आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीत तेल्हारा तालुका अग्रेसर बनलेला आहे.

या तालुक्यात २५० हेक्टरचा लक्षांक असताना २२१ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली. यापाठोपाठ अकोट तालुक्यात २५० हेक्टर लक्षांकाच्या तुलनेत १६६ हेक्टरला प्रशासकीय मिळाली होती. त्यापैकी संपूर्ण क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात यश आले. या दोन तालुक्यांचे काम जिल्हयात चांगले झालेले आहे.

तर दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्याला ९० हेक्टरचा लक्षांक दिलेला असताना आतापर्यंत केवळ १७.५ हेक्टरवर लागवड आटोपली आहे. अकोल्यात ११० हेक्टरचा लक्षांक असून १७.८५ हेक्टरवर लागवड झाली.बाळापूरमध्येही योजनेचे काम संथ आहे. या तालुक्यात ९० हेक्टर लक्षांक दिलेला असताना १२२ अर्ज आले होते.

MNGREGA
Orchard Cultivation : आव्हान - फळबागा वाचविण्याचे!

यासाठी प्रशासनाने १०६ हेक्टरला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी दिली. मात्र, यापैकी केवळ २८ हेक्टरवर फळबाग लागवड होऊ शकलेली आहे. पातूर, बार्शीटाकळी तालुक्यांना अद्याप लक्षांक गाठता आलेला नाही. फळबाग लागवडीत प्रामुख्याने केळी पिकाचा समावेश आहे. इतरही फळपिकांची लागवड करण्यात येत आहे.

तालुका लक्षांक

(हेक्टर) प्रत्यक्ष लागवड

अकोला ११० १७.८५

बार्शीटाकळी १२० ५१.८

मूर्तीजापूर ९० १७.५

बाळापू ९० २८

पातूर ९० ५५.६

अकोट २५० १६६.४

तेल्हारा २५० २२१.३९

एकूण १००० ५५८.५४

अकोला जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर योजनेत जवळपास ८०० हेक्टरवर तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५५८ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. मिळालेला लक्षांक साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळावे या हेतूने फळबाग शेती फायदेशीर ठरते.
शंकर किरवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com