Orchard Cultivation : परभणी जिल्ह्यात ‘मनरेगा’तून ३४८ हेक्टरवर फळबागा

MNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ हजार ४५२ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे.
Orchard Planting
Orchard PlantingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात २०२३-२४ मध्ये १ हजार ४५२ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. गुरुवार (ता.२०) पर्यंत जिल्ह्यातील ३९४ शेतकऱ्यांनी ३४८.४० हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे फळबाग लागवडीची उद्दिष्टपूर्ती करणे अशक्य झाले आहे. उलट पाण्याच्या दु्र्भिक्षामुळे लागवड केलेल्या फळबागा जिवंत ठेवण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे.

या वर्षी (२०२३-२४) ‘मगांराग्रारोहयो’तून जिल्ह्यात २ हजार ५०९ शेतकऱ्यांनी २ हजार २३७ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ५३५ लाभार्थींना २ हजार २६६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ३४९.४० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले आहेत. बुधवार (ता.२०) पर्यंत ३९४ लाभार्थींनी ३४८.४ हेक्टरवर फळबाग लागवड केली आहे.

Orchard Planting
Orchard Cultivation : फळबाग लागवडीतून साधली आर्थिक उन्नती

त्यात सर्व नऊ तालुक्यांत मिळून एकूण आंबा १५६.०६ हेक्टर, परभणी व गंगाखेड तालुक्यात मिळून एकूण चिकू ३.६ हेक्टर, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम तालुक्यात मिळून एकूण पेरू ७.८ हेक्टर, जिंतूर व पालम तालुक्यात मिळून डाळिंब ३.३५ हेक्टर, परभणी, जिंतूर, मानवत, पूर्णा तालुक्यात मिळून एकूण संत्रा ४३.९ हेक्टर लागवड झाला आहे. जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड, पू्र्णा तालुक्यात मिळून एकूण मोसंबी ९.८ हेक्टर परभणी, सेलू, गंगाखेड, पालम तालुक्यात मिळून एकूण लिंबू ९.८ हेक्टर, परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यांत मिळून एकूण नारळ १४.६ हेक्टर लागवड झाला.

Orchard Planting
Orchard Scheme : फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ५० कोटी

परभणी, जिंतूर, सेलू, पालम तालुक्यांत मिळून एकूण सीताफळ ९.६५ हेक्टर लागवड झाली. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यात मिळून एकूण केळी ४९.४७ हेक्टर लागवड झाली आहे. पाथरी तालुक्यात ४० हेक्टर शेवगा लागवड झाली आहे. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा तालुक्यांत मिळून एकूण गुलाब ३७.२७ हेक्टरवर तर जिंतूर व पूर्णा तालुक्यात मिळून एकूण निशिगंध २.७ हेक्टर लागवड आहे.

‘मनरेगा’तील तालुकानिहाय फळबाग लागवड (हेक्टर)

तालुका उद्दिष्ट क्षेत्र लागवड क्षेत्र

परभणी २७० ५२.८५

जिंतूर २७० ५९.३७

सेलू १४० ३३.९०

मानवत १३५ ३८.४०

पाथरी १४० ३१.६०

सोनपेठ १३० ७.०

गंगाखेड १४० १९.२७

पालम १३५ ५४.४

पूर्णा १४० ५१.६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com