ॲग्रो विशेष

Tamilnadu Agriculture Budget : तमिळनाडू सरकारकडून कृषी अर्थसंकल्प सादर

Tamilnadu Budget : ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’; जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर

Team Agrowon

Tamilnadu Government : चेन्नई (वृत्तसंस्था) ः तमिळनाडू सरकारने मंगळवारी (ता. २०) वेगळा कृषी अर्थसंकल्प सादर केला. या कृषी अर्थसंकल्पात क्लायमेट स्मार्ट व्हिलेजच्या निर्मितीची घोषणा केली असून बदलत्या वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामना करण्यात येईल. शेतकरी आणि अन्य भागधारकांना याचा मोठा लाभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तमिळनाडूचे कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री एमआरके पनीरसेल्वम यांनी मंगळवारी वेगळा कृषी अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर केला. या वेळी ते म्हणाले, ‘‘बदलत्या वैश्विक तापमानामुळे जैवविविधतेसमोरच मोठे आव्हान निर्माण झाले असून येत्या दोन दशकांमध्ये अन्न सुरक्षा आणि पिकांची उत्पादकता यावर विपरित परिणाम होऊ शकतो. या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर आपल्याला योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

या माध्यमातून पिकांचे संरक्षण तर करता येईलच पण त्याचबरोबर संभाव्य संकटांचाही अंदाज बांधता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाबाबत जाणीव जागृती करण्यात येईल तसेच प्रात्याक्षिकेही त्यांच्यासमोर सादर करण्यात येतील. या उपक्रमासाठी कृषी अर्थसंकल्पात १.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतीमध्ये जर जमिनीची सुपीकता वाढली तर उत्पादनदेखील वाढू शकते. जमिनीची उत्पादकता ही प्रामुख्याने ऑर्गेनिक कार्बन आणि सुक्ष्म घटकांवरती अवलंबून असते. त्यामुळे जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी सुक्ष्म जैविक घटकांचाही अभ्यास करण्यात येईल.’’

वेगळ्या दुकानांची सुविधा
शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने शहरांमध्ये विकता यावीत आणि ग्राहकांनादेखील उच्च दर्जाचा माल मिळावा या उद्देशाने शंभर वेगळी आस्थापने सुरू करण्यात येतील. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा वेगळा निधी राखून ठेवण्यात आला आहे. या दुकानांवरूनच पॅकेजिंग केलेला ब्रँडेड माल विकण्यात येईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT