Aslam Abdul Shanedivan
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
त्यांच्याआधी स्वातंत्र्य भारताचे पहिले केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री आरके षणमुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजीसादर केला.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत १४ वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहेत. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे देखील नाव आहे. पण याच्याआधी किती महिलांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला हे जाणून घेऊया.
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त दोन महिलांनीच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये पहिले नाव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्याने १९७० मध्ये १९७०-७१ चा अर्थसंकल्प मांडला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. त्यांची २०१९ नंतर एनडी सरकारचा पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. तर हा अर्थसंकल्प व्होट ऑन अकाउंट असेल. ज्यात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत.