Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Assistants Protest: कृषी सहायक संघटना करणार आंदोलन

Promotion Delay in Agriculture Department : कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

Akola News: कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विविध टप्प्यांत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष विलास रिंढे यांनी सांगितले.

सध्या कृषी सहायकांची एकूण ११५२७ पदे अस्तित्वात असून कृषी पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत. त्यामुळे कृषी सहायकांना सेवेची २० ते २५ वर्षे झाल्यानंतरही पदोन्नती मिळत नाही. सद्यःस्थितीमध्ये कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ६:१ याप्रमाणे आहे. ते ४:१ याप्रमाणे करण्यात येणे आवश्यक आहे.

यामुळे कृषी सहायकांची पदोन्नतीची कुंठितावस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या मागणीसाठी व कृषी सहायक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामकाज करीत असताना उद्भवणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी कृषी सहायक संघटना ऐन खरिपाच्या तोंडावर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेत आहे.

कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणींसंदर्भात संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी निवेदने देऊन व बैठकांमध्ये अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे.कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ याप्रमाणे करण्यात यावे, कृषी सहायक संवर्गाचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदाचे आदेश देण्यात यावेत,

कृषी विभागामध्ये वाढत्या ऑनलाइन कामाचा व्याप लक्षात घेता कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावेत, कृषी सहायकांना कायमस्वरूपी मदतनीस देण्यात यावा, ‘पोकरा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये कृषी सहायक यांना मदतनीस म्हणून समूह सहायक देण्यात यावेत, कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी, अशा विविध मागण्या व अडचणींसाठी कृषी सहायक संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे समजते.

पुणे येथील ९ एप्रिल २०२५ कृषी विभागाच्या कार्यशाळेमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी, कृषी सहायकांना लॅपटॉप देणार, कृषी सहायक संवर्गाचे पदनाम बदल करणार असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात या घोषणा अद्याप पूर्णत्वास आलेल्या नाहीत. क्षेत्रीय पातळीवर काम करताना कृषी सहायकांना विविध अडचणीना तोंड देत काम करावे लागत आहे.

कृषी सहायकांवरील अन्यायाविरोधात वरिष्ठ स्तरावरून कुठलीही दखल घेतली जात नाही, असे कृषी सहायक संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे नाइलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे विलास रिंढे व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

असे आहेत आंदोलनाचे टप्पे

५ मे-काळ्या फिती लावून कामकाज

६ मे-सर्व शासकीय व्हाटसॲप ग्रुपमधून बाहेर पडणे

७ मे-सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायक धरणे आंदोलन करतील

८ मे-कृषी सहायक एक दिवस सामूहिक रजेवर जातील

९ मे-सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार

१५ मे-सर्व योजनेचे कामबंद आंदोलन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT