Agricultural Development Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Development : कृषी विज्ञान संकुलामुळे कृषिक्षेत्राला मिळाली नवी दिशा

Agricultural Science Complex : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून काष्टी (ता. मालेगाव) येथे साकारलेल्या कृषी संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

Team Agrowon

Nashik News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून काष्टी (ता. मालेगाव) येथे साकारलेल्या कृषी संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. तसेच संकुलाच्या पुढील कामासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कृषिमंत्री कोकाटे हे मालेगाव दौऱ्यावर असताना काष्टी येथील कृषी विज्ञान संकुलाला भेट दिली. या वेळी शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित होते. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे यांनी उपस्थित मंत्र्यांचा सन्मान केला.

तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून हे संकुल साकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली. हे देशातील एकमेव संकुल आहे. यामध्ये एकाच ठिकाणी ५ कृषी व संलग्न महाविद्यालये व १ कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे.

या प्रसंगी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके तसेच संकुलातील प्रा. डॉ. सोमनाथ सोनवणे, या प्रकल्पाचे कंत्राटदार श्री. पवार, राजेंद्र भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VB-G RAM G : मनरेगाच्या नाव बदल करू नये; शेतकरी नेते नरेश टिकैतांचा सरकारवर टीका

Group Farming: गटशेती हाच शेतकऱ्यांसाठी शाश्वत मार्ग: डॉ. कापसे

Milk Processing : प्रक्रियेसाठी दुधाची गुणवत्ता तपासणी

Maharashtra Local Body Elections: कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, कुठे बोगस मतदान, जादूटोण्याचा प्रकारही उघडकीस

Cooperative Issue: ‘त्या’ संस्थांच्या मालमत्ता लिलावासाठी विशेष न्यायालय

SCROLL FOR NEXT