Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतीपिकांना कर्जाइतके विमा संरक्षण नाही

Crop Loan : खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपोटी आर्थिक हातभार देण्यासाठी असलेल्या विमा संरक्षणात यंदाही वाढ केलेली नाही.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपोटी आर्थिक हातभार देण्यासाठी असलेल्या विमा संरक्षणात यंदाही वाढ केलेली नाही. बॅंकांकडून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या तुलनेत ती कमी आहे.

त्यामुळे आपत्ती काळात नुकसान झाल्यास मिळालेल्या परताव्यातून कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याची स्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे येणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी पीकविमा योजना लागू केली.

त्यातून मिळणाऱ्या परताव्यातून किमान कर्जाची काही परतफेड करता यावी, असा या योजनेचा उद्देश आहे. तथापि, विमा कंपन्यांनी पीक कर्जाच्या तुलनेत कमी मोबदला देण्यासाठी आर्थिक भार संरक्षणाच्या स्वरूपात स्वीकारला आहे.

परतावा देताना जोखीम स्तर निश्चित करण्यात येऊन भरपाई दिल्या जाते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शंभर रुपयांचा परतावा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कायम आहे. त्यांना यंदा कर्जासाठी पात्र ठरविलेले नाही. परिणामी शेती सावकारांच्या घशात जाण्याची वेळ आली आहे.

कर्ज आणि विमा संरक्षण (प्रतिहेक्टर)

पीक...हेक्टरी कर्ज...विमा संरक्षण

कापूस...६३,५२५...५५,००

सोयाबीन...६१,२१५...५३,०००

तूर...४३,५६०...३६,८०२

ज्वारी...३१,९७०...२९,०००

मूग...२५,४१०...२२,०००

उडीद ः २५,४१० ः २२,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच

Sugarcane Season : साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या राहुट्या

Paddy Harvesting : चिखलातून भात कापणी, मळणीमुळे कष्ट वाढले

Onion Market : ओल्या कांद्यामुळे भावात सहाशेची घसरण

Animal Fodder : गडहिंग्लज तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध

SCROLL FOR NEXT