Crop Insurance : सांगली जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Crop Insurance Scheme : शासनाने सुरू केलेल्या शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे.
Fruit Crop Insurance Scheme
Fruit Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : शासनाने सुरू केलेल्या शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा योजना शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेत १ लाख ७६ हजार ७०३ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात १६ हजार ०११ शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलिताखाली आली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत अर्ज करणे आवश्यक आहे. निसर्गकोपाच्या संकटातून सावरण्यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेला पसंती दिली जाते.

Fruit Crop Insurance Scheme
Crop Insurance Issue : पीककर्जासाठी परळी तहसीलसमोर निदर्शने

अवेळी पावसामुळे अनेकवेळा हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे पीकविमा देऊन संरक्षण दिले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांना विमा घेऊन संरक्षण देतात.

शेतकऱ्यांनी संबंधित पिकांचा विमा उतरल्यानंतर सरकारकडूनही काही प्रमाणात विम्याचा हिस्सा भरला जातो. शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. जिल्ह्यात गतवर्षी ३ लाख ७७ हजार ४५० शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता.त्यापैकी २ लाख ६० हजार ३७१ शेतकऱ्यांना ११७ कोटी ०७ लाखाचा पीक विमा मंजूर झाला आहे.

Fruit Crop Insurance Scheme
Crop Insurance Return : सहा लाख शेतकऱ्यांना ८५३ कोटींचा विमा परतावा

यंदाही कृषी विभागाने प्रधान मंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रचार आणि प्रसद्धी केली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा घेण्यासाठी पुढे आले. सन २०२४ या खरीप हंगामात कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार ३ लाख ६१ हजार ४३९ शेतकऱ्यांनी पीकविमा घेऊन १ लाख ७६ हजार २६४ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा शेतकरी संख्या झाली कमी

शेतकरी पीकविमा घेऊन पिकांना संरक्षण देतात. नुकसान झाल्यानंतर पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला जातो. त्यानंतर पीकविमा मंजूर होते. परंतु शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन वेळेत मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पीकविमा घेण्यास पुढे येत नाहीत. परिणामी गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात १६ हजार ०११ ने पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

तालुकानिहाय खरीप हंगाम २०२४ साठी पीक विमा घेतलेले

शेतकरी संख्या आणि संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र

आटपाडी १८५२६ १२४३४

जत १४७१८१ ८६०९३

कडेगाव २८५५५ ११०९०

कवठेमहांकाळ ३३६०२ १४८४८

खानापूर २४५४९ ८८३२

मिरज २८४६४ १६०६७

पलूस ३९६६ १९११

शिराळा ९०३० २३४२

तासगाव ४८५५४ १६९६१

वाळवा १९०१२ ६१२२

एकूण ३६१४३९ १७६७०३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com