Agriculture Graduation  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Graduation Ceremony : पदवीदान कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचा डंका

Agriculture Graduation : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. २३) आयोजित २६ व्या पदवीदान कार्यक्रमात येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची डंका होता.

Team Agrowon

Latur News : परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. २३) आयोजित २६ व्या पदवीदान कार्यक्रमात येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची डंका होता.

महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकूण दहा विभागांपैकी आठ विषयांमध्ये आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने विद्यापीठामध्ये प्रथम स्थान प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केले.

यामुळे कृषी अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांनी आपला लातूर पॅटर्न सिद्ध केला. स्वर्गवासी डॉ. बालासाहेब माणिकराव ठोंबरे पाटील यांच्या नावे देण्यात येणारे बीएस्सी (कृषी) सुवर्ण पदक २०२४ हे पदवी शिक्षण घेणारी तेलंगणा राज्यातील साई चंदना या विद्यार्थिनीस प्राप्त झाले.

पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सीरीषा पेटा (कृषिविद्या), मयुरी गुंड (अनुवंश आणि पैदास शास्त्र), प्रज्ञा भोसले (कृषी अर्थशास्त्र), निकिता नेटके (कृषी विस्तार शिक्षण), सिद्धांत सोनवणे (दुग्धशास्त्र), शिवानी थोरात (कीटकशास्त्र) व श्वेता भट (वनस्पती रोग शास्त्र) यांनी सुवर्णपदक पटकविले.

या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सत्कार केला. या वेळी डॉ. दिनेशसिंग चव्हाण, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. विजय भामरे, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ. राजेश शेळके, डॉ. सुनीता मगर, डॉ. विनोद शिंदे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. अनंत शिंदे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. प्रभाकर अडसूळ, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, भगवान कांबळे, डॉ. संघर्ष शृंगारे, डॉ. अजित पुरी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’

Rain Deficit: पावसाअभावी भाजीपाला शेतीला फटका

Silk Farming: रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे: कोल्हे

Agricultural University Vacancy: कृषी विद्यापीठांत ५७ टक्के जागा रिक्त

PM Suryaghar Yojana: ‘सूर्यघर’चा साडेपंधरा हजार ग्राहकांनी घेतला लाभ

SCROLL FOR NEXT