Convocation Ceremony : कृषी स्नातकांमध्ये गुणवत्तेत मुलीच सरस

VNMKV Parbhani : सुवर्ण पदके पटकावलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या स्नातकांमध्ये मुलीची संख्या अधिक आहे. गुणवत्तेत मुलांच्या तुलनेत मुली सरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
VNMKV Parbhani
VNMKV Convocation CeremonyAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गुरुवारी (ता. २३) पार पडलेल्या २६ व्या दीक्षान्त समारंभात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या एकूण ३ हजार ४६२ स्नातकांना पदवी अनुग्रहित करण्यात आले.

त्यात आचार्य (पी. एचडी.) पदवीचे २९ पात्र स्नातक, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे (एम.एस्सी.) ३०७ स्नातक व पदवी (बी.एस्सी.) अभ्यासक्रमाचे३ हजार १२६ स्नातकांचा समावेश आहे. सुवर्ण पदके पटकावलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या स्नातकांमध्ये मुलीची संख्या अधिक आहे. गुणवत्तेत मुलांच्या तुलनेत मुली सरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

VNMKV Parbhani
VNMKV Parbhani : कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्‍चित केलेल्या सुवर्ण पदके, रौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करण्यात आली. त्यात १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, दात्यांकडून देण्यात येणारे १० सुवर्ण पदके, १ रौप्य पदक आणि ११ रोख पारितोषिकांचे वितरण करण्‍यात आले तसेच २४ पदव्युत्तर पदवी गुणवत्‍ता प्रमाणपत्र देण्यात आले.

सुवर्ण, रौप्य पदक, रोख पुरस्कार प्राप्त स्नातक....

आचार्य पदवी (पी. एचडी.)अभ्यासक्रम विद्यापीठ सुवर्ण पदकः प्रिती वायकुळे (कृषी कीटक शास्त्र), पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी.) अभ्यासक्रम विद्यापीठ सुवर्ण पदके ः मयूरी गुंड (अनुवंशिकी व वनस्पती पैदासशास्त्र एकूण ३ सुवर्णपदके), प्रीती भोसले (अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान), आकाश माने (कृषी अभियांत्रिकी), आरती सूर्यवंशी (सामुदायिक विज्ञान), प्रितिका कैरी (उद्यानविद्या), गौसोद्दीन अन्सारी (कृषी आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान), शुभम सुर्वे (एबीएम),

VNMKV Parbhani
VNMKV Parbhani : राष्ट्रीय परिषदेत ‘वनामकृवि’च्या विद्यार्थ्याच्या निबंधास प्रथम क्रमांक

श्वेता भट (कृषी वनस्पती रोगशास्त्र), पीता सिरीशा (कृषीशास्त्र २ सुवर्णपदके), शिवानी थोरात (कृषी कीटकशास्त्र), जयेश बोबडे(कृषी मृदा विज्ञान रौप्य पदक) आदीं स्‍नातकांचा समावेश आहे. पदवी (बी.एस्सी.) अभ्यासक्रम सुवर्ण पदके ः सिमी शुक्ला (कृषी), श्रावणी लोमटे (अन्न तंत्रज्ञान ३ सुवर्णपदके),

श्वेता निलवर्ण (कृषी अभियांत्रिकी), ऋतुजा तापडिया, तेजश्री आनरसे, गोपीका ए.(जैवतंत्रज्ञान), श्रुती गरड (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), बडावथ साई चंदन (कृषी), रोख पुरस्कार ः प्रिया सत्वधर, जयेश बोबडे, साक्षी कटाईत, मोहिनी खरवडे, पीता सिरीशा, श्र्वेता निलवर्ण, ऋतुजा तापडिया आदीं स्‍नातकांना प्रदान करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com