Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग

Agriculture Tips:महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी पिकाच्या टप्प्यानुसार योग्य सिंचन, कोळपणी आणि रोप व्यवस्थापन करावे. तसेच पावसाळ्यात जनावरांची योग्य निगा राखून रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Indian Agriculture:

ऊस

ऊस पिकामध्ये सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचनाद्वारे दिवसाआड पाणी द्यावे. प्रवाही पद्धतीने सिंचन करताना पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक आड सरी प्रमाणे पाणी द्यावे.

कापूस

पेरणीनंतर कापसाची सर्वसाधारणपणे १० दिवसांत उगवण होते. उगवण न झालेल्या ठिकाणी त्याच वाणाच्या बियाणे वापरून नांग्या भराव्यात. आणि लगेच पाणी द्यावे.

उगवणीनंतर १५ दिवसांनी प्रत्येक फुलीवर दोन जोमदार रोपे ठेवून उर्वरित रोपे उपटून टाकावीत.

मूग, उडीद

उगवण झालेल्या पिकांत लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी कोळपणी करून घ्यावी.

बाजरी

उगवणी झालेल्या पिकांत लागवडीनंतर १० दिवसांनी कोळपणी करून घ्यावी.

तूर

तूर पिकामध्ये मिश्रपीक म्हणून ज्वारी किंवा मका लागवड करावी. त्याचा पक्षीथांबे म्हणून उपयोग होतो.

मका

उगवण झालेल्या ठिकाणी गरजेनुसार नांगे भरून घ्याव्यात.

८ ते १० दिवसांनी पहिली कोळपणी करून घ्यावी.

पशुसंवर्धन

पावसाळ्यात जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.

स्थानिक भागात कोणत्या प्रकारच्या जंताचा प्रादुर्भाव जनावरांस होतो, याविषयी माहिती करून घ्यावी. जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी जनावरांच्या शेणाची तपासणी करावी. त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जनावरांना संतुलित आहार द्यावा. जेणेकरून जंतांच्या वाढीला आळा बसून त्यांचे नियंत्रण होईल. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर राखावा. वेळोवेळी गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार योग्य मात्रेतच औषधांचा वापर करावा.

०२४२६ २४३२३९

(प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT