Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग

Maharashtra Farming: राहुरी विभागात आगामी पाच दिवस अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पिकांची काढणी, साठवणूक आणि खरीप नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Agriculture Tips:

हवामान सारांश

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस काही ठिकाणी मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.

विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरिता दामिनी या मोबाइल ॲपचा वापर करावा.

पुढील तीन दिवस काही ठिकाणी मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कापूस

मागील हंगामातील कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यामुळे त्यावरील किडींच्या अवस्था नष्ट होतील.

कांदा

कांद्याची शक्य तितक्या लवकर काढणी पूर्ण करावी.

कांदा चाळीत तापमान अधिक व आर्द्रता कमी असल्यामुळे वजनात घट होते. साठवणुकीवेळी कांदा साठवणगृहातील तापमान व आर्द्रता यांचा विचार करणे आवश्यक असते. त्यासाठी नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना करावी. त्यामुळे तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून नुकसान कमी करणे शक्य होते.

रब्बी पिके

पावसाची शक्यता असल्याने, काढणीला आलेल्या पिकांची लवकरात लवकर काढणी करावी. मालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत.

साठवणुकीचे धान्य

साठवणीतील धान्यामध्ये ११ ते १२ टक्के, कडधान्ये ९ टक्के, तेलबिया ८ टक्के आणि भाजीपाला बियाण्यामध्ये ५ ते ६ टक्के इतका ओलावा राहील, अशा पद्धतीने बियाणे वाळवावेत.

पाण्याचे पुनर्भरण

चर, विहीर, तलाव यांमधील गाळ काढून घ्यावेत. तसेच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल व वाहून जाणार नाही यासाठी उपाय करावेत. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपद्वारे टाकीत जमा करावे. जेणेकरून त्याचा वापर विहीर किंवा बोअरवेल पुनर्भरणासाठी करता येईल.

खरीप नियोजन

पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाली असल्यास, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंबे तयार करावेत.

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपे तयार करावीत.

शेतजमिनीतील मातीचा नमुना घेऊन त्याची प्रयोगशाळेतून तपासणी करून घ्यावी. माती तपासणीमुळे त्यातील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू याबाबत माहिती होते.

खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची उपलब्धता करावी.

भाजीपाला पिके

पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या भाजीपाला पिकांची लवकरात लवकर काढणी करावी. काढणी केलेला भाजीपाला सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

फळ पिके

जोराच्या वाऱ्यामुळे फळझाडे कोलमडून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फळझाडांचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी फळझाडांना बांबू किंवा लाकडी काठ्यांच्या साह्याने प्लॅस्टिकच्या दोऱ्या बांधून आधार द्यावा.

०२४२६-२४३२३९

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT