Agricultural Advice Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Crop Management : कोकण विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखातून पाहूयात.

Team Agrowon

Agriculture Update :

पांढरा कांदा

रोपवाटिका तयारी

पांढरा कांदा रोपवाटिका पेरणीची कामे जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर सुरू करावीत.

रोपवाटिकेतील जमिनीची नांगरट करून ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. या गादीवाफ्यांवर ५ किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौरस मीटर क्षेत्र मात्रा द्यावी.

मधुमका

पूर्वमशागत आणि पेरणी

मधुमका लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी.

भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत. नांगरणीच्या वेळेस चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट १०० ते १२० किलो प्रति गुंठा प्रमाणे मातीत मिसळावे.

पिकास पाणी देण्यासाठी वाफे तयार करावेत.

लागवडीसाठी ८० ते १०० ग्रॅम बियाणे प्रति गुंठा क्षेत्रासाठी प्रमाणे वापरावे.

मधुमका बियाण्याची पेरणी टोकण पद्धतीने ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी. एका ठिकाणी दोन दाणे प्रमाणे ४ ते ५ सेंमी खोलीवर पेरावे.

पेरणीच्या वेळी ओळींमध्ये ७ ते ८ सेंमी खोलीवर २ किलो युरिया, ४ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति गुंठा खताची मात्रा द्यावी.

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा

थायरम ३ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझाटोबॅक्टर जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

चाऱ्यासाठी मका

चाऱ्यासाठी मका लागवड करण्यासाठी चांगला निचरा होणारी मध्यम प्रतिची सुपीक जमीन निवडावी. जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत.

नांगरणीच्या वेळेस चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट १०० ते २०० किलो प्रति गुंठा या प्रमाणे मातीत मिसळावे.

पेरणीसाठी ३०० ते ४०० ग्रॅम बियाणे प्रति गुंठा क्षेत्रासाठी पुरेसे होते. पेरणी दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणीच्या वेळी १.५ किलो युरिया खताची प्रति गुंठा मात्रा द्यावी. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

मोहरी

पूर्वमशागत

मोहरी पिकाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.

भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर जमीन नांगरणी करून ढेकळे फोडून जमीन सपाट करावी.

नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट शेतजमिनीत मिसळावे.

कोबी

रोपवाटिका

कोबी पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी.

रोपे तयार करण्याकरिता ३ मी. लांब, १ मी. रुंद, १५ सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावे.

तयार वाफ्यावर १२ ते १५ सेंमी अंतरावर विरळ बी पेरून मातीने हलक्या हाताने झाकून घ्यावे. त्यानंतर लगेच झारीने हलके पाणी द्यावे. बी बारीक असल्याने चाळलेल्या बारीक वाळूमध्ये समप्रमाणात मिसळून पेरणी करावी.

वांगी/मिरची/टोमॅटो

रोपवाटिका तयारी

रब्बी हंगामासाठी मिरची, वांगी, टोमॅटो पिकाची रोपे तयार करण्याकरिता जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरु करावीत.

वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा प्रमाणे मिसळावे.

साधारण ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.

बियाणे पेरणीच्या वेळेस गादीवाफ्यावर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौरस मीटर क्षेत्र या प्रमाणे मात्रा द्यावी. त्यानंतर १० सें.मी. अंतरावर ओळीने बियाणे पेरणी करावी.

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास, थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती होईल असे पाहावे.

(०२३५८) २८२३८७ ८१४९४६७४०१

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Update : राज्यात हलक्या पावसाची शक्यता; तापमानात चढ उतार शक्य

Ajit Pawar : पंतप्रधान मोदींकडे राज्यातील योजनांसाठी मागितला केंद्राचा निधी ः अजित पवार

Maharashtra Election 2024 : महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरांच्या मतविभाजनाची चिंता

Crop Damage : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान

Maharashtra Voting : मतदानापूर्वीच्या ४८ तासांसाठी निर्बंध जारी

SCROLL FOR NEXT