Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Rabi Sowing : बागायती रब्बी हंगामासाठी शेतांत सध्या पूर्वमशागत, मशागतीची कामे सुरू आहेत.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : बागायती रब्बी हंगामासाठी शेतांत सध्या पूर्वमशागत, मशागतीची कामे सुरू आहेत. तसेच शेतकरी आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शेतात शेणखताची भर करीत आहेत.

शेणखत आता दुरापास्त झाले आहे. त्याचे दरही वधारत आहेत. एक ट्रॉली शेणखत २६०० ते २८०० रुपयांना मिळत आहे. तेदेखील गावानजीक किंवा गावात मिळत नाही. अन्य तालुके, गावांमधून आणावे लागत आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Season 2024 : खानदेशात रब्बी पिकांची पेरणी ११० टक्क्यांवर शक्य

केळी पट्ट्यात शेणखताची मागणी असते. खानदेशात धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या भागांत शेणखताची मागणी असते.

यात पशुधनाची संख्या कमी झाली आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांकडे शेणखत उपलब्ध होत नाही. यामुळे शेतकऱ्यांना महागडे शेणखत घ्यावे लागत आहे. शेणखत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव या भागांत उपलब्ध आहे. धुळ्यातील साक्री, धुळे भागांतही शेणखत विक्रीस उपलब्ध असून, शेतकरी या भागातून त्याची खरेदी करीत आहेत.

शेणखतावर उपाय म्हणून अनेक शेतकरी पिकांचे अवशेष जमिनीत गाडतात. तसेच हिरवळीच्या खतांचा प्रयोग करतात. सध्या अनेक प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे बागायती रब्बीला बळ मिळणार आहे. अनेक शेतकरी शेतात माती टाकून घेत आहेत.

Kolhapur Rabi Season
Rabi Season 2024 : बाजरी, कंदा लागवड घटणार; मका, तेलबिया पिकांकडे कल

तसेच काळ्या कसदार जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेतकरी पांढरी, हलक्या क्षेत्रातील मातीची भर काळ्या कसदार जमिनीत करून घेत आहेत. या शेतांत हिरवळीचे पीक किंवा मूग, उडदाची पेरणी केली होती. या शेतांत आता केळीचे उत्पादन घेतले जाणार आहे.

शेतात शेणखत, माती टाकण्याचे काम या महिन्यात अधिक वेगात सुरू असून, दिवाळीपूर्वी हे काम आटोपून घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. शेणखताची भर केल्यानंतर खोल नांगरणी करून घेतली जात आहे. शेत २० ते २५ दिवस तापायला हवे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com