Crop Advisory  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Crop Management : खरीप ज्वारी पिकात अमेरिकन लष्करी अळीचा (शा. नाव : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Team Agrowon

Agriculture Update :

खरीप ज्वारी

पोटरी

खरीप ज्वारी पिकात अमेरिकन लष्करी अळीचा (शा. नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या पैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. फवारणी करत असताना द्रावण पोंग्यात पडेल असे फवारावे.

हळद

कंद धरणे ते कंद वाढ.

या काळात हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस (२५ टक्के) २ मिलि किंवा डायमिथोएट (३० टक्के) १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. (केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नाहीत, परंतु संयुक्त विद्यापीठ संशोधन समितीच्या शिफारशीचे निष्कर्ष आहेत)

उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत.

पानावरील करपा (लीफ स्पॉट - कोलेटोट्रिकम कॅपसिसीया) व पानांवरील ठिपके (लीफ ब्लॉच- टॅफ्रिना मॅक्‍युलन्स) या रोगांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रॅाबिन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि अधिक चांगल्या दर्जाचे स्टिकर ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

केळी

केळी बागेत खतमात्रा दिलेली नसल्यास ५० ग्रॅम नत्र प्रति झाड देऊन घ्यावे. नविन लागवडीच्या केळी बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला

वाढीची अवस्था/ काढणी

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. गवार या पिकामध्ये भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, कार्बेन्डाझीम (५० टक्के) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

भाजीपाला पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

मिरची, वांगे व भेंडी पिकात मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन (५ टक्के) +फेनप्रोपाथ्रीन (१५ टक्के) (पूर्व मिश्रित कीटकनाशक) १ मिलि किंवा डायमेथोएट (३० टक्के) १.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

कापूस

कापूस पिकात रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी या प्रमाणात फ्लोनिकॅमिड (५० टक्के) ०.३ ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन (२५ टक्के) २ मिलि किंवा डायनोटेफ्युरॉन (२० टक्के) ०.२५

ग्रॅम किंवा डायफेनथ्युरॉन (५० टक्के) १.२ ग्रॅम फवारावे.

तसेच गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणे गुलाबी बोंड अळीसाठीचे पेक्टिनोल्यूअर हे कामगंध सापळे लावावेत.

तसेच प्रादुर्भाव जास्त असल्यास थायोडीकार्ब (७५ टक्के) २.० ग्रॅम किंवा इमामेक्टिन बेंजोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस (५० टक्के) ०.३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२

(मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा.)

डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०

(कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

SCROLL FOR NEXT