Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Crop Management : माठ, कोथिंबीर बियाण्याची दोन ओळींत २० ते २५ सेंमी, तर मुळ्याची ४५ ते ६० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने करावी.

Team Agrowon

Indian Agriculture :

पालेभाजी

माठ, कोथिंबीर बियाण्याची दोन ओळींत २० ते २५ सेंमी, तर मुळ्याची ४५ ते ६० सेंमी अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी टप्प्याटप्प्याने आठवड्याच्या किंवा १५ दिवसांच्या अंतराने करावी.

कलिंगड

पूर्वमशागत व पेरणी

कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत.

लागवड सरी पद्धतीने २ बाय ०.५० मी. अंतरावर करावी.

कलिंगड पिकाची लागवड काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक (२१ मायक्रॉन) आच्छादन वापरून करावयाची असल्यास नांगरट करून जमीन समपातळीत आणावी. यानंतर ५ ते ७ सेंमी उंचीचे व ६० सेंमी रुंदीचे गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर २ मीटर ठेवावे.

ठिबक सिंचन वापरावयाचे असल्यास, आच्छादन अंथरण्यापूर्वी ठिबक सिंचनाचा संच वाफ्यावर पसरून घ्यावा.

प्लॅस्टिक आच्छादन गादीवाफ्यावर अंथरावे व कडांवर मातीचा थर द्यावा.

आच्छादनाच्या दोन ओळींमधील अंतर ४५ सेंमी ठेवून ३ सेंमी व्यासाची छिद्रे रुंदीच्या दिशेने पाडावीत. त्यानंतर लांबीच्या दिशेने ५० सेंमी अंतरावर सरळ रेषेत ३ सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. आच्छादनावर पाडलेल्या छिद्रात २ ते ३ सेंमी खोलीवर बियाण्याची पेरणी करावी.

पेरणीच्या वेळेस १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ११ ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आळे प्रमाणे खतमात्रा द्यावी.

संकरित कलिंगडाला पेरणीच्या वेळेस २ किलो चांगले कुजलेले शेणखत, २० ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति आळे प्रमाणे खताची मात्रा द्यावी. खतांचा थेट बियाण्यांशी येणार नाही याची दक्षता घ्यावी.

रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास,

थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम

प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति आळे प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.

(०२३५८) २८२३८७, ८१४९४६७४०१

(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT