Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Biodiversity : जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपणामुळे मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

Team Agrowon

Ahilyanagar News : जैवविविधता जपण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपणामुळे मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढते, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाअंतर्गत असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद्‍ व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत वन महोत्सव २०२५ आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी डॉ. खरबडे बोलत होते. या वेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, मृद्‍ व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. विक्रम कड, डॉ. वीरेंद्र बारई, सहायक कुलसचिव वैभव बारटक्के, डॉ. संगीता शिंदे, सुनील साळुंके, संतोष कहार, राहुल राजपुत, ज्ञानेश्‍वर मोरे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. रवींद्र बनसोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. सचिन नांदगुडे म्हणाले, की या पाणलोट क्षेत्राचा परिसर १२०० हेक्टरचा आहे. या १२०० हेक्टरवर पाणी साचवून ठेवण्यासाठी खोल सलग समतल चर, बंदिस्त वाफे, नाला बंडिंग करण्यात आलेले असून त्यामुळे या क्षेत्रात १२३.४० टीसीएम पाणी अडवले व जमिनीत मुरवले जात आहे.

या पाणलोट क्षेत्रामध्ये या वर्षीच्या वन महोत्सवात एक हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये ६०० बांबू व आवळा, जांभूळ व आंबा या ४०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उपस्थितांचे डॉ. वीरेंद्र बारई यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच 

Farmers Protest: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखला

Paddy Cultivation: दर्जेदार भात उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर

Karnataka Floods: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्नाटकात पीक नुकसानीची प्रति हेक्टर ८,५०० रुपये अतिरिक्त भरपाई

Sugarcane Farming: ऊस व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 

SCROLL FOR NEXT