
Nashik News : ‘‘गाव करील ते राव काय करील’’ अशी म्हण सर्वश्रुत आहे. त्याचाच प्रत्यय ठाणगावकरांनी केलेल्या हरितकरणाच्या संकल्पातून येत आहे. भूमिपुत्र अतिरिक्त प्राप्तीकर आयुक्त भरत आंधळे यांच्या संकल्पनेतून गावातील बेलटेकडी परिसरात ५१ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
त्यापैकी २१ हजार वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यात शेकडो ग्रामस्थ, वृक्षप्रेमी व विद्यार्थी सहभागी झाले होते. ठाणगांव येथील बेलटेकडी येथे राखीव वनातील डोंगरावर ग्रामस्थ, वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या सहभागातून ५० हेक्टर जागेत ५१ हजार वृक्षलागवड करण्याबाबत ग्रामसभा व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांनी वनविभागाकडे ठराव सादर केला होता.
त्यानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आहे. झालेल्या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपवन संरक्षक वन्यजीव अधिकारी गजेंद्र हिरे, उमेश वावरे, सिद्धेश सावर्डेकर, कर्नल मच्छिंद्र शिरसाट, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, माजी आमदार सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी, श्रीजी ग्रुपचे अंजन पटेल, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच विलास मोरे आदींसह ग्रामस्थ जवळपास ५०० विद्यार्थी,३०० पेक्षा अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.
वृक्ष लागवडीची पूर्वतयारी करताना बेलटेकडी, भिकरवाडी, आडवाडी रोड येथून सुरुवात करण्यात आली आहे. फक्त वृक्ष लागवड न करता वृक्ष संवर्धनाचाही संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. वृक्ष लागवड परिसरात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी तसेच वनवे नियंत्रणासाठी ही नियोजन केले जाणार आहे.ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.
बेल टेकडी परिसरात वृक्ष लागवडीची तयारी करताना सुरुवातीच्या टप्प्यात गेल्या एक महिन्याभरापासून जेसीबीच्या माध्यमातून ओपन करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. येथे आताआंबा, चिंच, कडुनिंब, बेहडा, जांभूळ, रिठ्ठी, वड, पिंपळ, बेल, आपटा, पळस, सीताफळ, करंज, हिरडा आदी १८ पेक्षा अधिक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
तीन वर्षांत दोन लाख वृक्षलागवडीचा संकल्प
आयुक्त भरत आंधळे यांनी सिन्नर तालुक्यात तीन वर्षात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प केला असल्याची माहिती दिली. त्याची ही सुरुवात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ११ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात आपण अग्रभागी राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.