J.P.Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Carbon : जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी ढासळली

Natural Agriculture Training : काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक जे. पी. शिंदे यांनी केले.

Team Agrowon

Jalna News : जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी ढासळली असून, त्यामुळे जमिनी नापीक होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक जे. पी. शिंदे यांनी केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत नैसर्गिक शेती या विषयावरील दोनदिवसीय प्रशिक्षणाच्या दुसऱ्या बॅचच्या उद्‍घाटन प्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी आणि मृद्‍ शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. शिंदे म्हणाले, की महाराष्ट्र राज्याने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या नैसर्गिक शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे निश्‍चित केले आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सोनुने म्हणाले, की बदलत्या परिस्थितीनुसार नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. उत्पादनाच्या बाबतीत देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण झाला आहे. तरी दर्जेदार व आरोग्यास पोषक असे अन्नधान्य, भाजीपाला व फळे पिकविण्यासाठी नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांनी हा विषय गांभीर्याने समजून घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रत्येकी दोन दिवसांची दहा प्रशिक्षणे घेणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चौधरी यांनी केले, तर आभार अजय मिटकरी यांनी मानले. जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सदरील प्रशिक्षणात जालना, मंठा व घनसावंगीतील शेतकरी सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT