Chandoli Sanctuary Affected agrowon
ॲग्रो विशेष

Chandoli Sanctuary Affected : चांदोली अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का? ८ दिवसांपासून आंदोलन

Forest Department Chandoli : आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून मोठ्या संख्येने वन विभागाच्या दारात ठिय्या मांडला आहे.

sandeep Shirguppe

Shramik Mukti Dal : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ठिय्या आंदोलन आठ दिवस झाले सुरू आहे. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून मोठ्या संख्येने वन विभागाच्या दारात ठिय्या मांडला आहे. मागच्या ८ दिवसांपासून ऊन्हाचा आणि थंडीचा कडाका सहन करत आंदोलक आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाण मांडले आहे. परंतु प्रशासनाकडून अद्यापही ठोस उपाय करण्यात आला नाही.

या आंदोलनास माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठींबा जाहीर केला.

तसेच शिवाजीराव परुळेकर यांनी मुख्य वनसंरक्षकांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची सोडवणूक झाली नाही तर आम्हीही या आंदोलनात सक्रिय होऊ, असे पत्र दिले. त्याची पोहोच त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

रमणमळा येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोरील चांदोली अभयारण्यग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या प्रश्नासंदर्भात वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले होते पंरतु यावर ठोस निर्णय झाला नाही.

दरम्यान कोल्हापुरात ठिय्या मारलेल्या सुमारे चारशे प्रकल्पग्रस्तांनी गावाकडून फडक्यात बांधून आणलेल्या भाकरीचा आधार त्यांना आहे. गेल्या २५ वर्षांपासून चांदोली अभयारण्यग्रस्त शेतजमीन मिळवण्यासाठी, शेतीला पाणी तसेच १,६५,००० गृहबांधणीसाठी अनुदान देण्याबाबतचा १० जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मिळावे, यासाठी ठिय्या आंदोलन करत आहेत. या प्रश्नासंदर्भात वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

दरम्यान, करवीरनगरीतील अनेकजण आंदोलकांना चादर, ब्लॅकेट देऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी पाठबळ देत आहेत. त्यांचे आंदोलकांकडून स्वागत केले. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष दाऊद पटेल, नजीर चौगुले, जगन्नाथ कुडतुडकर, रफीक पटेल, पांडुरंग पोवार, आकाराम झोरे, अमिना पटेल यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT