sandeep Shirguppe
पूर्वी घरी झोपण्यासाठी अथवा कांबरून घेण्यासाठी गोधडीचा वापर केला जायचा. परंतु जुन्या लोकांसोबत ही कला आता संपत चालली आहे.
या कलेला जपण्यासाठी कोल्हापुरातील स्मिता राजेश खामकर यांनी लुप्त होत चाललेल्या गोधडी कलेस उर्जितावस्था दिली आहे.
ग्रामीण भागात अजूनही जुन्या वापरलेल्या साड्यांपासून घराघरात गोधडी शिवली जात असली तरी शहरात हे प्रमाण कमी झाले आहे.
खामकर यांनी महिलांच्या प्रयत्नातून ही गोधडी नव्या रूपात आणि नव्या दिमाखात आकारास देत ‘संस्कार शिदोरी‘ हा ब्रँड तयार केला.
आतापर्यंत स्मिताताईंनी सुमारे अडीच हजार महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. अनेक नामवंत संस्थेमार्फतही त्यांनी हजारो महिलांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.
जन्मलेल्या बाळाच्या मऊदार दुपटा, कार्पेट, सिंगल-डबल बेड गोधडी अशा वेगवेगळ्या आकारात आणि डिझाईनमध्ये गोधडी निर्मिती केली जाते.
महिन्याला सुमारे पन्नास हजार रुपयांचे कापड खरेदी केले जाते. स्मिताताईंनी शिवाजी पेठेमध्ये गोधडी निर्मितीचे केंद्र सुरू केले आहे.
धाव टाक्यामुळे गोधडीचा पारंपरिक बाज जपला जातो. गोधडी ही शिलाई यंत्रावर तसेच हात शिलाई पद्धतीनेही तयार केली जाते.
स्मिताताई २०० महिलांकडून मागणीनुसार गोधडी शिवून घेतात. यातून प्रत्येक महिलेची घरबसल्या दरमहा ३००० ते ४००० रुपयांची कमाई होते.
गोधडीची विक्री प्रामुख्याने प्रदर्शन, सोशल मिडीया माध्यमातून होते. स्मिताताई इनरव्हील क्लबशी संबंधित असल्याने अनेक महिलांशी त्यांचा दररोजचा संपर्क आहे.
स्मिताताईंनी २०२२ साली दसऱ्याच्या पाचव्या माळेला महिलांच्या सहभागातून २१ फूट बाय २१ फूट आकाराची महा गोधडी अंबाबाई देवी चरणी अर्पण केली होती.