Mhaisal Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Irrigation Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामांसाठी १९ रोजी आंदोलन

Water Agitation : विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या निविदा काढून कामे सुरू करा जत तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने १९ फेब्रुवारीाला नगर ते विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे,

Team Agrowon

Sangli News : विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांच्या निविदा काढून कामे सुरू करा जत तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने १९ फेब्रुवारीाला नगर ते विजयपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी दिली.

विस्तारित म्हैशाळ सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ९८१ कोटींची निविदा काढून कामे सुरू केली आहेत. कामे गतीने सुरू आहेत. मात्र ६५ गावांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा अद्याप सर्व्हे झाला नाही. या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता नाही. निविदा प्रक्रिया नाही.

जत तालुक्यातील सर्वपक्षीय बैठकीत ६५ गावांतील विस्तारित सिंचन योजनेच्या कामांचा सर्व्हे करून तत्काळ निविदा काढून कामे सुरू करावीत यासाठी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या वेळी १९ फेब्रुवारी रोजी उमदी, मुचंडी, डफळापूर, संख, शेगाव आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर ते विजयपूर बसस्थानक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, महंमद कलाल, चिदानंद संख, सिद्र्या शिंदे, गोपाल माळी, केशव पाटील, श्रीमंत परगोंड, अरविंद मुंगळे, तानाजी मोरे, दत्ता भोसले उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT