Milk Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : दूधदरासाठी आजपासून शेतकरी संघटनेचे आंदोलन

Milk Rate Issue : दुष्काळी परिस्थितीवर मात करत दूध व्यवसाय जोपासला, पण सरकारी पातळीवर दुधाला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने दूध उत्पादक पुन्हा आक्रमक होऊ लागले आहेत.

Team Agrowon

Nagar News : दुष्काळी परिस्थितीवर मात करत दूध व्यवसाय जोपासला, पण सरकारी पातळीवर दुधाला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याने दूध उत्पादक पुन्हा आक्रमक होऊ लागले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात २४ जूनला शेतकरी संघटनेने आंदोलन पुरकारले असून नेवासा, पारनेर व अन्य भागांतील शेतकरीही प्रशासनाला निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा देत आहेत. नगर जिल्ह्यातून सुरुवात करत दूधदरासाठीचे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी समन्वय समिती प्रयत्न करत आहे.

राज्यातील साधारण पाच लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात. त्यातील साठ ते सत्तर टक्के कुटुंबांकडे दुभत्या गाई आहेत. राज्यात दररोज साधारण दोन ते सव्वादोन कोटी लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते.

सरकारी पातळीवर दुधाची खरेदी करणारा महानंद संघ बंद पडल्यात जमा आहे. त्यामुळे या सर्व दुधाची खरेदी खासगी दूध संघ करतात. दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे कारण पुढे करत नेहमीच दुधाचे दर पाडले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. या वर्षी तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती असल्याने चारा, पिण्याच्या पाण्याची टंचाई होती.

दुधासाठी येणारा खर्च व त्यात पन्नास टक्के नफा पाहता गाईच्या दुधाला ८१ रुपये प्रतिलिटर दर गरजेचा आहे. मात्र २७ रुपये दर देऊन दूध संघ चालक लूट करत आहेत. दुग्धविकासमंत्री, सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.
अनिल औताडे, दूध उत्पादक शेतकरी व नेते शेतकरी संघटना, नगर जिल्हा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market: कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी

Cotton Farmers Seminar: कापूस संशोधन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी पीक परिसंवाद

Israel Iran conflict: इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला; इराणमध्ये आणीबाणी, मध्यपूर्वेतील तणाव तीव्र

Washim Development: समन्वय, नियोजनातून प्रगती

Ayushman Bharat Yojana: रुग्णालयांत उपचारांचे दरपत्रक लावावे लागणार

SCROLL FOR NEXT