Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : दूध उत्पादकांना दिलासा न दिल्यास आंदोलन

Dairy Farmer : दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : दुधाचे दर सातत्याने कोसळत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला किमान ३४ रुपये दर दिला जाईल, अशी घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली होती. प्रत्यक्षात मात्र आज दुधाला केवळ २५ रुपये दर मिळतो आहे.

आंदोलनामुळे सुरू करण्यात आलेले दूध अनुदानही सरकारने बंद केले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे मोठा असंतोष आहे. राज्य सरकारने या असंतोषाची तातडीने दखल घेऊन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या मार्गाने जावे लागेल असा इशारा किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे नेते व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितले, की दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र हे अनुदान केवळ ६ आठवडे म्हणजेच केवळ २ महिने दिले गेले.

दुधाला आज मिळणारा दर पाहता हे अनुदान पुन्हा सुरू करावे, दूध उत्पादकांचा वाढता तोटा व वाढता उत्पादनखर्च पाहता अनुदानामध्ये वाढ करून अनुदानाची रक्कम प्रतिलिटर किमान १० रुपये करावी, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ जानेवारी ते १० मार्च या काळात केवळ अनुदान दिले गेले; पुढील चार महिने अनुदान बंद आहे; बंद काळातील अनुदानासह थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावे, अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.

राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची राज्यात तीव्र टंचाई आहे. औषधोपचार व आनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादनखर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकार व राज्याचे दुग्धविकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर येताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर अखेर दूध उत्पादकांना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असेही अजित नवले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Leaf Blight: भातावरील करप्याचे कारण ओळखूनच उपाय करा

Crop Damage: पाऊस पडला तरी पिकांचे नुकसान भरून येणार नाही

Crop Loan Burden : कर्जाआधीच शेतकऱ्यांच्या खिशाला झटका!

Automated Weather Stations: आजऱ्यात हवामान केंद्रांसाठी ६५ ग्रामपंचायतींची सहमती

Maize Threshing: बागायती मका पीक मळणीवर

SCROLL FOR NEXT