Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew MSP : काजू बीला २०० रुपये हमीभाव द्या, अन्यथा आंदोलन

Cashew Rate : काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षांपूर्वी प्रतिकिलो २०० रुपये असणारा काजू बीचा दर १०० ते ८० रुपयांवर आला.

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजूवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे चार वर्षांपूर्वी प्रतिकिलो २०० रुपये असणारा काजू बीचा दर १०० ते ८० रुपयांवर आला. त्यामुळे काज उत्पादक अडचणीत आले आहेत.

त्यामुळे शासनाने काजू उत्पादकांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी २०० रुपये हमीभाव द्यावा, अन्यथा १६ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काजू बागायतदारांनी शासनाला दिला.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काजू उत्पादकांची बैठक कणकवली येथील गोपुरी आश्रमात झाली. या बैठकीला श्रमिकचे सुनील निचम, अतुल दिघे, शांताराम पाटील, जिल्हा फळ बागायतदार संघाचे विलास सावंत, व्ही. के. सावंत, नितीन मावळणकर, हेमंत सावंत, पंकज दळी, संदीप राणे, आदर्श मोरजकर आदी उपस्थित होते.

चार-पाच वर्षांपूर्वी काजू बीचा दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेला होता. परंतु शासनाने काजूवरील आयातशुल्क कमी केले. त्याचा मोठा परिणाम काजू बीच्या दरावर झाला. काजू बीचे दर घसरून २०० वरून १०० ते ८० रुपयांवर आला. दापोली विद्यापीठाने काजू उत्पादनाचा खर्च १२९ रुपये प्रतिकिलो येतो, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे काजू बीला कमीतकमी १९३ रुपये दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी उत्पादकांनी केली. या मागणीसाठी येत्या १६ फेब्रुवारीपासून काजू उत्पादक धरणे आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

गोवा सरकारने काजू बीला १५० रुपये दर हमीभाव दिला आहे. त्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारनेदेखील दर जाहीर करावा. जेणेकरून राज्यातील काजू उत्पादक आर्थिक संकटातून बाहेर येतील.
- अतुल दिघे, काजू उत्पादक, रत्नागिरी
सिंधुदुर्गातील काजूला जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. तरीही काजू बीला अपेक्षित दर मिळत नाही ही शोकांतिका आहे. शासनाने काजू उत्पादकांचा अंत न पाहता काजू बीला हमीभाव जाहीर करावा.
- विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT