Knowledge and Information  Agrowon
ॲग्रो विशेष

Sanjay Gorde : ज्ञान आणि माहितीचे युग

आइनस्टाईन हा जगातील सर्वाधिक बुद्धिमान मनुष्य म्हणून ओळखला जातो. त्याने मानवी मेंदूचा सर्वाधिक उपयोग केला असावा असा दावा केला जातो.

Team Agrowon

आइनस्टाईन (Einstein) हा जगातील सर्वाधिक बुद्धिमान मनुष्य म्हणून ओळखला जातो. त्याने मानवी मेंदूचा सर्वाधिक उपयोग केला असावा असा दावा केला जातो. पण तो त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या घटकेला म्हणतो, मला वाटलं होतं की मी जे ज्ञान मिळवलं त्या अनुषंगाने सुरुवात केलेला एक प्रवास कधीतरी संपेल, कधीतरी जगातलं संपूर्ण ज्ञान एकदाचं मिळवलं जाईल!

सगळ्या रहस्यावरून पडदा उठेल, जगाला अज्ञात असं काहीच उरणार नाही, पण ते काही खरं नाही. पुढे ते म्हणतात, की दरवेळी मी ज्ञानाची एक कक्षा प्राप्त केली, त्या वेळी मला माझ्याच अज्ञानाचे हसू आले. या ज्ञानाच्या कक्षांचा आवाका वाढतच जातो आहे. आणि आता असे वाटतेय की ज्ञानाचा हा महासागर अमर्याद आहे व ते कधीच संपूर्णपणे मिळवता येणारं नाही.

ज्ञान हे संस्कार, स्वानुभव, मार्गदर्शन आणि व्यक्तिगत समज यांच्या परिपाकातून प्राप्त होत असते. तर माहिती फक्त माहिती असते ती दिली घेतली जाऊ शकते. माहितीचा कसा वापर करायचा हे आपण आजवर प्राप्त केलेल्या ज्ञानाने आलेले व्यावहारिक शहाणपण ठरवत असते. त्यासाठीचा विवेक, तारतम्य व समयसूचकता मात्र आपल्याकडेच असायला हवी. पूर्वी एकेका संदर्भासाठी माहिती मिळवावी लागायची.

आता कितीही जटिल माहिती तुम्हांला सेकंदभरात उपलब्ध होते. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता आला तरच या सगळ्याचा उपयोग. त्यासाठी आपले आकलन आणि समज महत्त्वाची आहे.आज आपण माहितीच्या महासागरात गटांगळ्या खात आहोत. पाण्यात असून, पाण्यासाठी म्हणजे खऱ्या ज्ञानासाठी तडफडणाऱ्या मासळीसारखी आपली अवस्था आहे. कारण आपण ज्ञान आणि माहिती यात गल्लत करतो.

आपल्याला पंचतंत्रापासून ते रामायण महाभारतापर्यंत सर्वच गोष्टी ज्ञान देत आल्या आहेत. माणसाला एकाचवेळी सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक पातळ्यांवरील उत्कर्षासाठी ज्ञानाची आणि माहितीची आवश्यकता असते. आजच्या सर्व विद्याशाखांनी या दोन्हींचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या शिक्षण प्रणालीत एक समजदार माणूस घडवण्याची ताकद असली पाहिजे. माणसाचे जीवन उन्नत आणि सुविधायुक्त बनविण्याची ताकद विज्ञानाकडे नक्कीच आहे. पण विज्ञानाची कास धरताना आपण कंगाल मानसिकतेने उपभोगाच्या आहारी जात आहोत. आजही रामायण, महाभारत ही पूर्वीचीच महाकाव्ये अधिक प्रभावी व संस्कारशील आहेत हे आपल्याला कबूल करावे लागेल. म्हणून आज माणसाला या दोन्हींचीही गरज आहे. कारण हे ज्ञान आणि माहितीचे युग आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US India Trade Tension: अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का?

Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या

Urea Data Mismatch: पावणेतीन लाख टन युरियाचा हिशेब लागेना

Monsoon Heavy Rain: मुसळधार पाऊस, पूरस्थितीचा फटका

Maharashra Monsoon Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT